कनिका बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच उरलेले नाही....बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना व्हायरसच्या चौथ्या चाचणीतही पॉझिटिव्ह ठरली आहे. तिच्या जवळच्या नातेवाईकांनी या बातमीला दुजोरा दिला. तिच्यावर उपाय सुरू असले तरी सतत येणा-या पॉझिटिव्ह चाचण्यामुळे सर्वजण हवालदिल झाले आहेत. 

कनिकाचा संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये उपचार सुरू आहेत. कनिकाचा पहिल्यांदा कोरना पॉझिटिव्हचा रिपोर्ट आल्यानंतर २० मार्च रोजी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या पूर्वी ती लंडनहून ९ मार्चला भारतात परतली होती. त्यानंतर तिने कानपूर आणि लखनौमध्ये प्रवास केला होता. याकाळात तिचा खोकला आणि ताप वाढला होता.

 तिच्या नात्यातील एकाने नाव न उघड करण्याच्या अटीवर सांगितले, तिच्या टेस्ट रिपोर्ट्समुळे आम्ही घाबरलो आहोत. याचा अर्थ उपचारांना कनिकाचे शरीर साथ देत नाही असे नाही. या लॉकडाऊनच्या काळात तिला आम्ही अ‍ॅडव्हान्स ट्रिटमेंटसाठी शिफ्टही करू शकत नाही. ती बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यापलीकडे आमच्या हातात काहीच उरलेले नाही. संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी कनिकाची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले आहे.
थोडे नवीन जरा जुने