रात्री झोपताना कोमट दुधात विलायची टाकून घ्या फायदा होईलविलायची एक सुगंधित मसाला आहे. खाद्यपदार्थांचा गंध वाढवण्यात विलायची महत्त्वाची भूमिका बजावते. गोड पदार्थाची चव वाढवण्यासाठी विलायची उपयोगात आणली जाते. विलायचीमध्ये आयर्न आणि रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन 'सी' तसेच नियासिन हे तत्व आढळून येतात. लाल रक्त पेशी वाढवण्यासाठी विलायची उपयुक्त आहे. विलायची खाण्याचे आणखी काही खास फायदे आहेत.
पचनशक्ती व्यवस्थित राहते -


विलायचीचे सेवन केल्यास पोटातील गॅस, सूज, हृदयातील जळजळ कमी होते तसेच पचनशक्ती वाढते. जर तुम्हाला अपचनाचा त्रास असेलत तर, दोन-तीन विलायची, अद्रकाचा छोटासा तुकडा, थोडीशी लवंग आणि धने पावडर एकत्र करून मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण गरम पाण्यातून घेतल्यास अपचनाची समस्या दूर होईल.

एक विलायची, एक अद्रकाचा तुकडा, लवंग आणि तुळशीचे पाच पानं विड्याच्या पानात टाकून खाल्यास सर्दीत आराम मिळेल.

घशात खरखर होत असल्यास सकाळ-संध्याकाळ एक विलायची चावून-चावून खावी आणि त्यावर कोमट पाणी प्यावे.

चक्कर येत असेल किंवा मळमळ होत असेल तर लगेच एक विलायची तोंडात टाका. आराम मिळेल.

कमजोरी दूर करते -

विलायची शक्तिशाली आणि उत्तेजक टॉनिक आहे. यामुळे केवळ शरीर सुदृढ होत नाही तर शीघ्रपतन, नपुंसकता रोखण्यात सक्षम आहे. विलायची दुधामध्ये टाकून उकळून घ्या. चांगल्याप्रकारे उकळून घेतल्यानंतर त्यामध्ये मध टाकून हे दुध रात्री झोपण्यापूर्वी घेतल्यास कमजोरी दूर होते.

नपुंसकता दूर करण्यासाठी बदाम(एक, दोन), चारोळ्याचे दाणे (२ ग्रॅम) आणि तीन विलायची एकत्र कुटून घ्या. दररोज रात्री झोपण्यापूर्वी या मिश्रणाचे सेवन केल्यास नपुंसकता दूर होईल.


फुप्फुसाशी संबधित रोग दूर होतात -

विलायची अस्थमा, खोकला, ताप आणि फुप्फुसाशी संबधित आजारांमध्ये लाभकारी आहे. आयुर्वेदामध्ये विलायचीला एक गरम मसाला मानले जाते. विलायची शरीराला आतून गरम ठेवते. विलायची खाल्ल्यास कफ बाहेर पडतो. सर्दी, खोकला किवा छातीमध्ये कफ असेल तर या त्रासातून मुक्त होण्यासाठी विलायची उत्तम नैसर्गिक उपचार आहे. जर तुम्हाला सर्दीचा खूप त्रास असेल तर गरम पाण्यामध्ये विलायची तेलाचे काही थेंब टाकून वाफ घेतल्यास आराम मिळेल.


हृदयाची गती नियमित राहते -

विलायचीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असते. यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलिसिस प्रक्रियेला लाभ होतो. विलायची हृदयाची गती नियमित ठेवण्यासाठी सहायक ठरते. तसेच ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवते. यामुळे हृदय निरोगी ठेवण्यासाठी दररोज जेवणात विलायचीचा वापर अवश्य करा.


अ‍ॅनिमिया - 

एक ग्लास गरम दुधामध्ये एक-दोन चिमुटभर विलायची पावडर आणि हळद टाका. चवीनुसार साखर टाकू शकता. अ‍ॅनिमियाची लक्षणं आणि कमजोरीपासून दूर राहण्यासाठी दररोज रात्री हे दुध प्यावे.

तोंडातील दुर्गंधी दूर करते - विलायचीमध्ये अँटीबॅक्टीरियल गुण असतात. तसेच याच्या गंधामुळे तोंडातील दुर्गंधी दूर होते. दररोज जेवण झाल्यानंतर विलायची खावी किंवा सकळी विलायाचे टाकलेले चहा प्यावा.


शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी -

विलायची मँगनीजचा एक प्रमुख स्रोत आहे. मँगनीजचा एंजाइमच्या स्रावमध्ये महत्वाची भूमिका बजावते. हे फ्री रॅडिकल्सला नष्ट करते. या व्यतिरिक्त, विलायचीमध्ये शरीरातील विषारी तत्व बाहेर करण्याचा एक गुण आढळून येतो. विलायची कँसररोधी घटकाचे काम करते.
थोडे नवीन जरा जुने