रोज सकाळी एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर काय होईल ?


आयुर्वेदात कोमट पाणी पिण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत. आपण रोज सकाळी   एक ग्लास कोमट पाणी प्यायले तर पोट कमी होते आणि यासोबतच अनेक आरोग्य समस्या दूर होतात. आज आम्ही कोमट पाणी पिण्याच्या 10 फायद्यांविषयी सांगणार आहोत.

पोट कमी होते : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे पोट कमी होते.


सर्दी-पडसे दूर : कोमट पाणी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. यामुळे सर्दी-पडशाची समस्या दूर होते.

दम्याची समस्या नियंत्रित : रोज कोमट पाणी प्यायल्याने घशातील कफ निघतो. यामुळे दम्याची समस्या नियंत्रित होते.

स्नायुदुखी : कोमट पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे स्नायू मोकळे होतात आणि वेदना कमी होतात.

किडनीसाठी चांगले : रोज सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर निघते. अशा वेळी किडनी खराब होण्याचा धोका टळतो.

 प्रतिकारशक्ती वाढते : गरम पाण्यात लिंबू मिळवून प्यायल्याने शरीराला व्हिटॅमीन सी मिळते. प्रतिकारशक्ती वाढते.

एसिडिटी दूर करते : रोज कोमट पाणी प्यायल्याने शरीरामधील अॅसिडचे प्रमाण नियंत्रित होते. यामुळे एसिडिटीची समस्या दूर होते.

 भूक वाढवते : रोज कोमट पाणी प्यायल्याने जेवणाचे योग्य प्रकारे पचन होते. यामुळे भूक वाढण्यात मदत मिळते.
थोडे नवीन जरा जुने