महिलांसाठी मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे...

आजच्या आधुनिक आणि भोवंडून टाकणा-या जगात आपल्या मुलांना एक सुफल आयुष्य मिळावे यासाठी घर आणि नोकरी अश्या दुहेरी जबाबदा-या सांभाळताना नोकरदार महिला मागेपुढे पाहत नाहीत. हे काम आव्हानात्मक आहे हे वास्तव स्त्रियांनी सर्वप्रथम स्वीकारायला हवे, तरच सकारात्मक मार्ग सुचतील..


आधुनिक जीवनशैलीमध्ये घर आणि कामाचे ठिकाण यात कसरत अंतर्भूत असते व असे करताना दोन्ही ठिकाणी भरीव वेळ देणे आवश्यक असते. नोकरदार स्त्री आणि आईसाठी हे बरेचदा खूप तणावपूर्ण आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या थकवून टाकणारे असते.

घर आणि ऑफिस दोन्ही जबाबदा-या सारख्याच पद्धतीने सांभाळण्यासाठी निरंतर एका तणावपूर्ण दिनक्रमातून जावे लागते लागतो. यात कदाचित स्त्रीचे स्वत:च्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष होऊ शकते कारण दिवस सरत जातात तसतशी ती सतत प्रत्येक बारीकसारीक गोष्टीचे व्यवस्थापन करण्यात गुंतून जाते. जबाबदा-यांच्या याद्यांतली प्रत्येक गोष्ट आपण केली की नाही याच्या नोंदी मनात करत राहते.

सतत फिरतीवर असल्याने जेव्हा स्वत:कडे पाहण्याची वेळ येते तेव्हा ती सहज उपलब्ध असणारे पर्याय स्वीकारते, उदाहरणार्थ वेळ मिळेल तसे, आणि वेळेला जे काही मिळेल ते खाणे, मुले, घर, डॉक्टरांकडच्या खेपा असे सगळेच सतत सांभाळत राहिल्याने पुरेशी झोप मिळत नाही.

यामुळे हृदयाशी संबंधित दुखणी, रक्तदाब किंवा अगदी मज्जासंस्थेशी संबंधित प्रश्नही उपस्थित होऊ शकतात. नोकरदार माता बरेचदा तणावपूर्ण मनस्थिती, थकल्याची जाणीव, घाईगडबड आणि मुले, जोडीदार वा मित्रमंडळींना पुरेसा वेळ देत नसल्याचा अपराधी भाव अशा भावनांतून जात असतात.

काम सर्वोत्तम व्हावे यासाठी लागेल ती मदत देऊ करण्यासाठी आणि आजच्या आधुनिक आणि भोवंडून टाकणा-या जगात आपल्या मुलांना एक सुफल आयुष्य मिळावे यासाठी दोन्ही जबाबदा-या सांभाळताना त्या मागेपुढे पाहत नाहीत.

हे काम आव्हानात्मक आहे हे वास्तव स्त्रियांनी सर्वप्रथम स्वीकारायला हवे. एकदा ही गोष्ट मान्य केली की उपाय सुचतील. करदार मातांनी काम वाटून घेण्याची गरज आहे. सगळ्या कामांची सूत्रे आपल्याच हातात ठेवणे योग्य नाही. आपल्याला चिंतेने घेरले आहे वा नैराश्य आले आहे तर अशी मनोवस्था ओळखण्याची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये अशी मानसिक तक्रार उद्भवणे स्वाभाविक आहे आणि सुदैवाने त्यावर उपायही सहज उपलब्ध आहेत.

मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे आणि वेळीच त्यावर उपचार करणे गरजेचे आहे. त्यातूनच आपल्यासाठी व आपल्या मुलांसाठीही एक दर्जेदार आयुष्य घडविता येईल.
थोडे नवीन जरा जुने