हे करा त्वचा नेहमी सुंदर आणि ताजीतवाणी राहीलत्वचा नेहमी सुंदर आणि ताजीतवाणी ठेवण्यासाठी खाण्या-पिण्यावर लक्ष ठेवणे गरजेचे असते. याच खाण्या-पिण्याच्या काही पदार्थ तुमच्या वाढत्या वयाचा प्रभाव तुमच्या त्वचेवर दिसून देत नाहीत. 

या खाद्यपदार्थांमध्ये अँटीऑक्सीडेंट्स आणि फायटोकेमिकल्स असल्याने आजारांनावर मात करण्यासाठी त्यांची मदत होते. चला आज जाणून घेऊया अशाच काही साध्या पदार्थांविषयी जे तुमच्या वाढत्या वयाचा प्रभाव दाखवत नाहीत. तुमची त्वचा नेहमी टवटवीत ठेवतात.

1. आंबट फळ-

आंबट फळ जसे संत्री, मोसंबी, अंगूर, लिंबू इत्यागी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सी, बायोफ्लेव्होनॉइड आणि लाइमोनीन अधिक प्रमाणात आढळते. या फळांमध्ये अँटीऑक्साइड आढळते, जे त्वचेला दिर्घकाळ तरुण ठेवण्यास मदत करतात.

2. लसूण-

लसणात एलीसिन नावाचे तत्व असते. या तत्वामुळे रक्त तसेच, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होते. त्यामुळे रोगप्रतिकार क्षमता वाढते. सोबतच, यात अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लसणाचे नियमित सेवन केल्याने त्वचा ताजीतवाण राहून वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही.

3. सफरचंद आणि स्ट्रॉबेरी-

सफरचंद आणि स्ट्रॉबेरीमध्ये विद्रव्य फायबर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. या फळांमध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सीडेंट आढळते. त्यामुळे याचे नियमित सेवन केल्याने त्वचा नेहमी तरुण दिसते. हे पदार्थ कर्करोगाशी लढण्याससुध्दा मदत करतात.

4. कोबी-

कोबी, पत्ता कोबी, ब्रोकली, ब्रसेल्स स्प्राऊट्स आणि कोबीचे इतर प्रकार आजारांवर मात करण्यासाठी सर्वात फायदेशीर आहेत. या भाज्यांमध्ये बीटा-कॅरोटीन, इंडो लेसग्ल्यूकोइन्नोलेट्स आणि आइसोथियो सायनेट्स (विशेषत: ब्रोकलीमध्ये आढळतात) त्वचेला तरुण ठेवण्यास मदत करतात.


5. हिरव्या भाज्या-

पालक, मेथी, सलाड पत्ता, ओवा इत्यादींमध्ये बीटा केरोटीनचे प्रमाण भरपूर असते. शिवाय यामध्ये कॅल्शिअम , आयर्न, फोलिक अॅसिड, व्हिटॅमिन सी आणि पोषक तत्वसुध्दा आढळते. हिरव्या भाज्यांचे सेवन केल्यास त्वचा नेहमी टवटवीत दिसते.
6. ग्रीन टी-

ग्रीन टीमध्ये पॉलिफिनॉल आढळते. सोबतच यामध्ये अधिक प्रमाणात अँटीऑक्सीडेंटसुध्दा असते. म्हणून नियमीत स्वरुपात ग्रीन टीचे सेवन केल्यात त्वचा सुंदर आणि तरुण दिसते. सोबतच पोटाच्या आजावरसुध्दा मात करते.

7. मासे-

मॅकेरल मासा, सॅल्मन, ट्यूना, सार्डिन, हेरिंग, लेक, ट्राऊटसारखे माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी एसिड असतात. याच्या सेवनाने त्वचा नेहमी टवटवीत दिसते.


8. ऑलिव्ह ऑइल-

ऑलिव्ह ऑइल रोज चेह-यावर लावल्यास अथवा खाण्यात त्याचा वापर केल्यास त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा होतात.

9. टोमॅटो-

टोमॅटोमध्ये लाइकोपिन तत्व आढळते. हे एकप्रकारचे कॅरीटिनॉइड आहे. सोबतच यात अँटीऑक्सीडेंट्ससुध्दा असते. याचे सेवन केल्याने त्वचा टवटवीत दिसते आणि वाढत्या वयाचा प्रभाव दिसत नाही.

10. दही-

दहीमध्ये जिवंत बॅक्टेरिया असते, जे पचनक्रियेस मदत करतात. दहीमध्ये कॅल्शिअमचे प्रमाणसुध्दा असते, त्यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने