गूळ-तुप पोळीची न्याहारी असते उत्तम...


सकाळ आणि संध्याकाळी काय न्याहारी घ्यावी हा मोठा प्रश्न असतो. वडापाव, शेवपुरी असे अरबट चरबट पदार्थ खाण्यापेक्षा तुप-गूळ लावलेली पोळी केव्हाही उत्तम असते. तुप-गूळ लावलेली पोळी दोन्ही वेळच्या न्याहारीसाठी कशी उत्तम आहे हे सुप्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुतुजा दिवेकर सांगताहेत.

 संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान खाण्यासाठी हा परिपूर्ण आहार आहे.

वडा-पाव, शेव-पुरी, सामोसा यासारखे अरबट -चरबट पदार्थ खाल्ले जात नाहीत.

रात्रीचे जेवण आपोआप हलके होते व झोपताना पोट जड होत नाही.

पचनक्रिया चांगली राहते. अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी, मलावरोध यासारखे त्रास होत नाहीत.

ने-आण करण्यास सोयीचे पडते.

घरून येतानाच एखाद् दुसरी चपाती जास्त आणा किंवा दुपारच्या /रात्रीच्या जेवणातील एखादी वगळून ठेवा.

गूळ खाल्ल्यामुळे सर्दी खोकला होत नाही व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

तूप हे सांध्यांसाठी नसíगक वंगण आहे. पाठ, गुडघे, घोटे कंबर या वजन पेलणाऱ्या सांध्यांचे यामुळे संरक्षण होते.

तूप आतड्याच्या आतील आवरण मजबूत करते. अ‍ॅसिडिटी कमी करते व भूक नियंत्रित करते.

 संध्याकाळच्या वेळेस खाल्लेल्या पौष्टिक नाश्त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण व्यवस्थित राहते. आपल्या जीवनशैलीशी निगडीत स्थूलत्व आणि डायबेटीस सारखे आजार दूर राहतात.

बंदोबस्ताच्या डयुटीवर हा नाश्ता नेणे सहज शक्य आहे.

सहा वाजायच्या सुमारास थोडेतरी खाणे फार जरूरीचे आहे. कारण बहुतेक पोलीस रात्री साडेदहा नंतरच जेवू शकतात. त्यांना साधारणपणे दीड तास तरी घरी पोचायला लागतो

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मला डायबेटीस आहे, मला तूप गूळ पोळी खाऊन चालेल का?

हो. नक्कीच. रक्तातील साखरेवर यामुळे नियंत्रण राहील आणि संध्याकाळचे निकृष्ट खाणे बंद होईल. सकाळ व रात्रीच्या जेवणादरम्यान बराच वेळ जातो. मध्ये तूप गूळ पोळी खाल्ली की दोन जेवणांमधला वेळ कमी होईल. रात्री जास्त जेवले जाणार नाही. यामुळे निवांत झोप लागण्यास मदत होईल. फास्टींग ब्लड शुगर (सकाळी रिकाम्या पोटी केली जाणारी रक्तशर्करेची मापणी) नियंत्रणात राहील.

एका वेळेस मी किती चपात्या खाऊ शकतो/शकते?

तुम्हाला गरज असेल तितके खा. खाल्ल्यावर तन आणि मन दोघांनाही उत्साही वाटायला हवे. पोळी – तूप- गूळ गुंडाळीच्या किंवा कुस्करून लाडूच्या स्वरूपात नेणे सोयीचे होऊ शकते.

तुपातल्या कोलेस्टेरॉलचे काय?

यूएसए सारख्या विकसित देशातून हल्लीच मिळालेल्या आहार आरोग्याशी संबंधित सूचनांनुसार कोलेस्टेरॉल हे एक पोषक द्रव्य आहे आणि आहारातून मिळत असलेल्या कोलेस्टेरॉलवर मर्यादा घालण्याची काहीच आवश्यकता नाही. आपण उगीचच ‘फॅट’ ला आणि नेमकेपणाने सांगायचे तर कोलेस्टेरॉलला ह्रदयरोगासाठी दोषी ठरवतो.

कोलेस्टेरॉल व्हिटॅमिन डी च्या शोषणासाठी तसेच सेक्स हार्मोन्सची पातळी व्यवस्थित राहण्यासाठी गरजेचे असते. यामुळे पीसीओडी आणि थायरॉईड सारख्या व्याधी टळतात. तूप जरूर वापरा. कारण त्यामुळे सांधेदुखीला आराम पडेल.

अ‍ॅसिडिटी, ब्लड शुगर नियंत्रणात राहील. बहुतेकांना यातील सर्व नाही पण एखादी तरी व्याधी सतावते. संध्याकाळी तूप गूळ पोळी खाणे म्हणजे या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी उचललेले एक पाऊल आहे.

सकाळी चहा चपाती ऐवजी तूप गूळ पोळी खाऊ का?

हो. खाऊ शकता. कुठल्याही वेळेस खाण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
थोडे नवीन जरा जुने