रुचकर, पाचक कांदा


पाचक, शक्तिवर्धक, तिखट, उत्तेजक, रुचकर इत्यादी कांद्याचे गुणधर्म आहेत. त्यातही लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा गुणाने अधिक श्रेष्ठ आहे. अशा या कांद्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
» बेशुद्ध पडलेल्या व्यक्तीच्या नाकाजवळ कांदा ठेचून लावावा. लवकर शुद्ध येते.

» चांगली झोप येण्यासाठी कांदा बारीक करून दहयातून खा. पण रात्री दही खाऊ नये.

» कावीळमध्ये गूळ + पांढरा कांदा + थोडी हळद मिक्स करून खा. कावीळ लवकर बरी होते.

» कांदा रोज खाल्याने छातीतील कफ पातळ होऊन लवकर निघतो.

» अजीर्ण झाल्यास कांद्याचा रस + आलं रस मिसळून घ्या.

» दातदुखीत कच्चा कांदा चावून चावून खाल्ल्याने जंतू मरतात.

» कांदा खाल्ल्याने रक्ताच्या गुठळ्या होत नाहीत. कोलेस्टेरॉल कमी होतं. हार्टअ‍ॅटॅक येत नाही.

» कांदा + गूळ मुलांनी रोज खाल्याने त्यांची उंची चांगली वाढते.

» कानदुखीत कांद्याचा रस गरम करून थंड झाल्यावर कानात घाला.

» कांदा भाजून सकाळी काही दिवस खाल्याने अंगातील कडकी कमी होते.

» पांढरा कांदा बारीक चिरून लोण्यात तळावा. नंतर त्यामध्ये मध घालून सकाळी अनशापोटी खावा. यामुळे जननेंद्रिय होऊन कामवासना वाढते.

» रक्तीमुळव्याध झाल्यास लाल कांद्याचा रस आणि खडीसाखर मिक्स करून घ्या. रक्त पडणे थांबते.

» जेवणामध्ये कांदा आवश्य खा. रक्ताभिसरण चांगले राहते.

» कांदा + चिंच + मध + लाल व हिरवी मिरची + िहग + मेथी दाणे + मीठ + तेल यांची चटणी करून खा. हृदयासाठी फार उपयुक्त आहे.

» चवीने तिखट असलेला तसेच नवीन कांदा कमी खाणे.
थोडे नवीन जरा जुने