झोप न येण्याचा समस्येने त्रस्त असल्यास हे उपाय नक्की करुन पहा

रात्री झोप न येण्याची ही समस्या जगभरात अनेकांना जाणवत आहे. किंबहुना या समस्येत बरीच वाढ होत आहे. यालाच इनसॉम्निया असं म्हणतात. कामाच्या ठिकाणी असणारा तणाव, शारीरिक श्रमाचा अभाव, तांत्रिक कामांमध्ये सतत गुंतून राहणे यासारख्या गोष्टींमुळे इनसॉम्नियासारखी समस्या उद्भवते. जर तुम्ही झोप न येण्याचा समस्येने त्रस्त असल्यास तर यापासून अतिशय स्मार्ट पद्धतीने सुटका करुन घेऊ शकतात.

रात्री लवकर जेवा
या विषयावर अभ्यास करणाऱ्या अनेक संशोधकांच्या मते रात्री जेवण हे झोपण्याच्या तब्बल २ ते अडीच तास आधी करणं गरजेचं आहे.सं नाही केल्यास तुम्हाला अपचन होण्याची शक्यता असते. जे झोप न येण्याचं प्रमुख कारण आहे.

आपला बिछाना बदला
तुम्ही जर योग्य प्रकारची गादी वापरत नसाल तर ती तुमची झोप खराब करू शकते. यामुळे तुम्ही रात्रभर निवांत झोपू शकत नाही. तसेच स्नायूंवर ताण, नस दबणं, अंगदुखी यासारखे त्रासही होऊ शकतात. त्यामुळे ज्या प्रकारची गादी किंवा बिछाना तुमच्या शरीराला योग्य वाटत असेल त्याचीच निवड करावी.

झोपण्याची जागा
तुम्ही ज्या जागी झोपणार आहात त्या ठिकाणी मोबाइल किंवा इतर मनोरंजन करणारी उपकरणं असू नये. त्याऐवजी तुम्ही जिथे झोपणार आहात त्याचा आजूबाजूला सुगंधी मेणबत्त्या, चित्त एकाग्र करणारं संगीत याचा वापर करावा. यामुळे तुम्हाला नक्कीच शांत झोप लागू शकते.

शारीरिक श्रमथकलेल्या शरीराला आरामाची गरज असते. त्यामुळे दर दिवशी किमान एक तास कठीण श्रम किंवा व्यायाम करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला निवांत झोप लागू शकते.
थोडे नवीन जरा जुने