वारंवार डोके दुखण्याचा त्रास असेल तर हे कराडोकं दुखणे एक सामान्य समस्या आहे, परंतु ही समस्या वारंवार होत असेल तर हे आरोग्यासाठी ठीक नाही. वारंवार डोके दुखण्याचा त्रास असेल तर याकडे सामान्य आजार समजून दुर्लक्ष करू नका. 

त्वरित वैद्यकीय उपचार सुरु करा. आज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगत आहोत, ज्या वारंवार निर्माण होणाऱ्या डोकेदुखीला कारणीभूत ठरतात.

1. स्ट्रेस

तणावाला डोकेदुखीचे सर्वात मोठे कारण मानले जाते. मायग्रेनची समस्या जास्त स्ट्रेस घेणाऱ्या लोकांना होऊ शकते. एखादा व्यक्ती तणावात असल्यास त्याच्या मान आणि खांद्याजावालील नसा ताणल्या जातात, ज्यामुळे डोकं दुखायला सुरुवात होते.

2. जास्त राग

रागाला मनुष्याचा शत्रू मानले जाते आणि वास्तवामध्ये असे आहेसुद्धा, कारण रागामुळे विविध आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या लोकांना वारंवार राग येतो, त्यांना डोकेदुखीची समस्या होण्याची शक्यता जास्त राहते.

3. झोपेची कमतरता

शांत झोप शरीर आणि मेंदू दोघांनाही पूर्णपणे ताजेतवाने करते. जे लोक शांत आणि पूर्ण झोप घेतात, ते आपल्या कामामध्ये जास्त लक्ष केंद्रित करू शकतात. याच्या ठीक उलट, जे लोक रात्री व्यवस्थित झोपू शकत नाहीत त्यांना डोकेदुखीला सामोरे जावे लागते.


4. केस बांधल्याने

केस बांधण्याच्या पद्धतीने किंवा हेअर पिन खूप जास्त घट्ट लावल्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. विविध हेअर जेलच्या उपयोगानेसुद्धा डोकेदुखी होऊ शकते. यामुळे, ज्या लोकांना वारंवार डोकेदुखीची समस्या असेल त्यांनी केस घट्ट बांधू नयेत.

5. हार्मोन्स

हार्मोन्सचे संतुलन बिघडल्याने डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. अनेक महिलांना मासिकच्या सुरुवातीला डोकेदुखीची समस्या निर्माण होते. याचे मुख्य कारण हार्मोन्सचे असंतुलन आहे.
थोडे नवीन जरा जुने