वैवाहिक जीवनात सुखी राहायचं असेल तर हे कराआपली संस्कृती जगासाठी आदर्शवत होती आणि आहे. धरतीला माता मानणारी आपली संस्कृती केवळ मनुष्यच नव्हे तर प्राणी आणि वनस्पतींमध्येही ईश्वर असल्याचे मानते. एकेकाळी जगदगुरू असलेला आपला देश अनेक विषयांत पुढे होता. 

आयुर्वेद आणि योगशास्त्रात आरोग्याबद्दल मूलभूत गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. प्रजनन आणि संतती उत्पत्ती याविषयीही विपुल लेखन आपल्या शास्त्रांमध्ये आहे. 

आयुर्वेदातील प्राचीन ग्रंथ चरक संहितेत संतती आणि बुद्धीसंततीचे वर्णन आहे. सुसंततीसाठी रसायन औषधींची माहितीही त्यात आहे.

आयुर्वेदात कुटुंबनियोजनाविषयी खूप माहिती नाही, कदाचित त्या काळी कुटुंबनियोजनाची इतकी आवश्यकता नसावी. आपल्या ग्रंथांमध्ये गर्भस्थापना आणि प्रजास्थापन द्रव्य याविषयी माहिती आहे. 18 व्या शतकानंतरच्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये मात्र संतती नियमनविषयक बरीच माहिती आहे. 

अशाच काही आयुर्वेदिक ग्रंथांतून संकलित केलेली माहिती येथे दिली आहे. तज्ज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच याविषयीचे प्रयोग करावेत.

आयुर्वेद आणि योगशास्त्रात सुसंततीसाठी काही गोष्टींची माहिती आहे. आयुर्वेदात सुसंततीसाठी आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य उपयुक्त असल्याचे सांगितले आहे. चरक संहितेच्या अतुलगोत्रीय अध्यायात मैथुन अर्थात सेक्ससाठी योग्य आणि अयोग्य स्त्रीचे वर्णन आहे. 

विकृत मानसिक अवस्थेतून निपजणा-या विकृत संतानांच्या उत्पत्तीचेही वर्णन आहे. तसेच सुसंततीसाठी मार्गदर्शनही आहे.


आयुर्वेदात गर्भनिरोधासाठी काही नियम सांगण्यात आले आहेत. याने कुटुंबनियोजन करणे शक्य आहे. आर्तव दर्शन किंवा मासीक पाळी (1 ते 4 दिवस). नंतर ऋतुकाल 12 दिवसाचा काळ (5 ते 17 दिवस). हा काळ आचार्यांनी गर्भ उत्पत्तीसाठी अनुकूल असल्याचे म्हटले आहे. यानंतरचा 9 ते 13 दिवसांचा काळ (18 ते 28 दिवस) ऋतुव्यतीतकाल मानण्यात आले आहे. 

ऋतुकालात सेक्स केल्याने गर्भधारणा होते. ऋतुव्यतीत काळात सेक्य केले तरी गर्भधारणेची जवळपास शक्यता नसते. आधुनिक विज्ञानानेही हे मान्य केले आहे. ऋतुव्यतीत काळाला आधुनिक विज्ञानाने सेफ पिरीयड मानले आहे.


महर्षी चरक यांनी स्त्रीला विविध शारीरिक स्थितीत ठेवून तिच्याशी सेक्स करण्याला चुकीचे मानले आहे. या स्थितीत सेक्स करणे धोकादायक असू शकते असे चरक महर्षींनी म्हटले आहे. उजवीकडे किंवा डावीकडे झोपवून सेक्स करणे हानीकारक असल्याचे म्हटले आहे.

 महर्षी पतंजली यांनी सांगितल्यानुसार नासिका किंवा नाडी शोधन करून आपण आपल्या इच्छेनुसार संतान प्राप्त करू शकतो.
थोडे नवीन जरा जुने