हा आहे एक घातक आजार तुम्हाला ही लक्षणे जाणवत असेल तर....
स्किजोफ्रनिया हा असा आजार आहे, ज्याचा रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांवर देखील परिणाम होतो. यासाठी लवकर निदानाचे महत्त्व, मुख्य लक्षणांना ओळखणे, आजाराशी सामना आणि आजाराबाबत एकूण उपचार या बाबी महत्त्वाच्या असतात. कौटुंबिक पाठिंबा महत्त्वाचा ठरतो.


चुकीच्या समजुती, अस्पष्ट किंवा गोंधळलेली मन:स्थिती, दुस-यांना ऐकू न येणारे आवाज ऐकू येणे, समाजामध्ये कमी सहभाग व भावनिक अभिव्यक्त आणि प्रेरणेचा अभाव यांसारखी आजाराची लक्षणे स्पष्ट होतात.

यासाठी सविस्तर व माहितीपूर्ण उपचार आवश्यक ठरतात. ज्यामध्ये सर्वांगीण उपचार पद्धती, औषधे, समुपदेशन, कौटुंबिक थेरपी, पाठिंबा देणारे समूह, पुन:एकीकरण आणि मानसिक-सामाजिक बदल यांचा समावेश आहे.

जगभरातील आकडेवारीतून असे दिसून आले आहे की, आजाराचे १ टक्का प्रमाण १.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. भारतात आजाराचे प्रमाण काहीसे अधिक म्हणजेच अंदाजे १.२ टक्के आहे.

तसेच, वयाच्या १५ ते २० वर्षाच्या काळामध्ये स्किजोफ्रेनिया आजार होण्याची दाट शक्यता असते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेन्टल हेल्थ अँड न्युरो सायन्सेस (एनआयएमएचएएनएस) व नॅशनल कमिशन ऑन मायक्रोइकॉनॉमिक्स एण्ड हेल्थ (२००५) यांनी नुकतेच सादर केलेल्या अहवालांमधून पुढील बाबी दिसून आल्या:

स्किजोफ्रेनियासारख्या आजारांचे सर्वाधिक प्रमाण पुरुषांमध्ये दिसून आले. जवळपास १० ते २० दशलक्ष भारतीय (एकूण लोकसंख्येपैकी १ ते २ टक्के) तीव्र मानसिक आजारापासून पीडित आहेत.

‘आजार व त्यावरील उपचाराबाबत जागरुकता व माहितीचा अभाव आहे. हीच दोन घटके आजाराचे लवकर निदान व उपचारामध्ये अडथळा निर्माण करतात. या मानसिक आजारावर कोणताच उपाय नाही, असे नाही. योग्य निदान व वेळेवर केलेले उपचार यशस्वी परिणाम आणण्यामध्ये मदत करू शकतात.

कुटुंबे व त्यांच्या केअरगिव्हर्सना आजाराबाबत योग्यवेळी समजण्यामध्ये मदत करण्याकरिता या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

थेरपीमधून जाणा-या रुग्णासाठी सर्वात मोठा पाठिंबा असलेल्या कुटुंबातील सदस्यांना आजाराबाबत माहीत असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा कुटुंबांसाठी आजाराबाबत विचारपूस करण्याकरिता, सामील होण्याकरिता आणि मदत घेण्याकरिता हा एक प्लटफॉर्म आहे.
थोडे नवीन जरा जुने