तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता? आहारात या गोष्टींचा करा समावेश



शरीरात मेंदू हा सर्वात जास्त गुंतागुंतीचा आणि शक्तिशाली अंग असतो, परंतु आपली नेहमी एक तक्रार असते की काही लक्षात राहत नाही. तुम्ही छोट्या- छोट्या गोष्टी विसरून जाता? एखादी महत्वाची गोष्ट तुम्ही विसरलात असे झाले आहे का? काही लोकांना विसरण्याचा आजार असतो. 

एखादी गोष्ट लक्षात आल्यानंतर आपण एवढी महत्त्वाची गोष्ट कशी विसरलो याचा ते विचार करत बसतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काही छोटे घरगुती उपाय .काही ब्रेन फूडस्. खाल्ल्याने अल्झायमर्ससारखा रोग होत नाही. तसेच मेंदूची शक्‍तीसुध्‍दा वाढते.

टोमॅटो-

आंबट-गोड टोमॅटो जेवणाची चव वाढवतो. टोमॅटोमध्ये प्रोटीन, विटामिन, स्निग्ध पदार्थांचे गुण असतात.यात कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. टोमॅटोमध्ये लायकोपिन असते. हे शरीराचे फ्री रॅडीकल्सपासून रक्षण करते. हे मेंदूतल्या पेशींचे नुकसान होण्यापासूनदेखील वाचवते.

दालचीनी-

अल्झायमरच्या रोग्यांसाठी दालचीनी हे जबरदस्त औषध आहे. दालचीनीच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि डोकं स्वस्थ राहते.

सफरचंद-

खूप कमी लोकांना माहित असेल की, सफरचंदामध्ये असलेला पेक्टिन हा विशेष फायबर असतो. हा इम्यून सपोर्टिव्ह प्रोटीन्सच्या पातळी वाढवते. म्हणून दिवसभर एक सफरचंद तुमच्या अनेक आजारांवर मात करण्यास उपयोगी ठरते. रोज सफरचंदाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते.
 
ग्रीन टी-

चहात आढळणारे पॉलीफिनॉलमुळे मनाचे संतुलन राखण्यास मदत करते. हे मनाची शांतता आणि एकाग्रता वाढवते. ग्रीन टीमध्ये भरपूर गुण असतात. यात अधिक प्रमाणात अँटीऑक्सीडंट सापडतात. याच्या नियमित सेवनाने शरीर स्वस्थ राहते. दिवसातून दो ते तीन कप ग्रीन टी प्यायल्याने स्मरणशक्ती वाढते.


दही-

दह्यात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, स्निग्ध पदार्थ, खनिज, लवण, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आढळतात. दह्याच्या नियमित सेवनाने अनेक फायदे होतात. हे शरीरात लाभदायक जीवाणुंची वाढ करतात आणि हानिकारक जीवाणुंना नष्ट करतात. यामध्‍ये अमायनो अॅसिड आढळते, ज्यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि स्मरणशक्ती वाढते.
अक्रोड-

रोज अक्रोड खाल्ल्याने शरीरात पोषक तत्वांची वाढ होते. सोबतच तब्येतीच्या अनेक समस्या दूर होतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3, फॅटी अॅसिड्स, प्रोटीन, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर समाविष्ट असतात. रोज थोडे अक्रोड खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते.


स्ट्रॉबेरी-

स्ट्रॉबेरी आपल्या मनमोहक सुगंधामुळे जगभरात लोकप्रिय आहे. स्ट्रॉबेरीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. स्ट्रॉबेरी मिल्क शेक, आइस्क्रीमच्‍या स्वादात भर घालते. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सीडंट आढळतात, जे स्मृतीभ्रंशाचा धोका दूर करतात.

ऑलिव्ह-

हे नुसतंच आपल्या स्वास्थ्यासाठी नाही तर चेहर्‍यासाठी देखील लाभदायक ठरते. यात मोठ्या प्रमाणावर फॅटस् असतात. त्यामुळे हे स्मरणशक्ती वाढवण्याचे काम करते.


जायफळ -

जायफळ आपल्‍या विशेष स्वाद आणि सुगंधासाठी प्रसिद्ध आहे. जायफळमध्‍ये डोकं स्वस्थ ठेवण्यासाठी मदत करणारे तसेच स्मरणशक्ती वाढवणारे गुण असतात.

हळद-

हळद मेंदूसाठी एक चांगली औषधी आहे. ही फक्त जेवणाचा स्वाद आणि रंगात भर घालत नाही तर डोकं शांत आणि स्वस्थ ठेवते. याच्या नियमित सेवनाने अल्झायमर रोग होत नाही. मेंदूतल्या खराब पेशींना दुरूस्त करण्याचे काम करते.
थोडे नवीन जरा जुने