निरोगी आयुष्यासाठी गुणकारी आहे मटकी !

आपल्या रोजच्या आहारातील, पचण्यास हलकी असलेल्या मटकीचं उगमस्थान भारतातील असून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत सापडतं. तर वायव्य भारतात १ हजार २०० मी. उंचीपर्यंत मटकीची लागवड केली जाते.

आपल्या रोजच्या आहारातील, पचण्यास हलकी असलेल्या मटकीचं उगमस्थान भारतातील असून हिमालय ते कन्याकुमारीपर्यंत सापडतं. तर वायव्य भारतात १ हजार २०० मी. उंचीपर्यंत मटकीची लागवड केली जाते. परंतु मटकीचं उत्पादन फक्त भारतातच केलं जात नसून पाकिस्तान, म्यानमार, ऑस्ट्रेलिया, अमेरिकन खंडातील काही देशांतही केलं जातं. विग्नार या वंशात मटकीचाही समावेश करण्यात आला आहे.

यामध्ये आधी फक्त मूग, उडीद, तूर, चवळी यांचा समावेश केला होता. परंतु आता मटकीचाही त्यात समावेश आहे. मटकीची लागवड नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होते. मटकीचं उत्पादन कोरडय़ा किंवा निमकोरडय़ा जागेत केलं जातं. मटकीचं पीक हे मृद्संधारणासाठी अतिशय उपयुक्त आहे.

याची मुळं मादक असतात. सुश्रुत संहितेत मटकीचा उल्लेख वनमुग्द या नावाने केला आहे. मटकीमध्ये जलांश १०.८ टक्के, प्रथिने २३.६ टक्के, स्निग्ध पदार्थ १.१ टक्के, तंतू ४.५ टक्के व इतर काबरेहायड्रेट ५३.५ टक्के आणि खनिजे १०० ग्रॅममध्ये ३.५ ग्रॅम आढळतात. मटकीमध्ये प्रामुख्याने कॅरोटीन, थायामीन, रिबोरफ्लाविन आणि क जीवनसत्त्वे असतात. अशा या मटकीचे गुणधर्म पुढीलप्रमाणे -

मटकीमध्ये रोगप्रतिकार क्षमता अधिक आहे, त्यामुळे डॉक्टर आजारपणात मटकी खाण्याचा सल्ला देतात.

 ड्रग्जचं व्यसन असणा-यांना मटकी अत्यंत गुणकारक आहे. मटकीमुळे व्यसनाधीन लोकांना काहीशा प्रमाणात फरक पडतो.

 मटकी वाजीकर, पित्तविकार रोधक, पाचक व हृदयास बल देणारी आहेत.

मोड असलेल्या मटकीत ‘क’ जीवनसत्त्व प्रामुख्याने आढळतं. त्याशिवाय मटकी पचनाला सर्वात हलके कडधान्य आहे.

वजन संतुलित राखण्यासाठीही मटकीचा वापर केला जातो.

आपल्या वाढत जाणा-या अतिताणावर नियंत्रण ठेवण्यासाठीही मटकीचा वापर केला जातो.
थोडे नवीन जरा जुने