बहुपयोगी शेवगा
मित्रांनो शेवग्याच्या झाडाचे महत्त्व सहजीवन आणि भाजीसाठी शेंगा एवढयापुरता मर्यादित नाही. इंग्रजीमध्ये शेवग्याला ‘मिरॅकल ट्री’ म्हणतात. या झाडाचे खूप सारे उपयोग आहेत जे की बहुतेक लोकांना माहीत नाहीत.
आफ्रिकेत शेवग्याच्या झाडाची पाने वाळवून पावडर केली जाते व कुपोषणावर मात करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. काय असतं या पानांत?

» संत्र्यापेक्षा ७ पट जास्त क जीवनसत्त्व.

» गाजरापेक्षा ४ पट जास्त ‘अ’ जीवनसत्त्व.

» दुधापेक्षा ४ पट जास्त कॅल्शिअम

» केळीपेक्षा ३ पट जास्त पोटॅशिअम

» दहयापेक्षा दुप्पट प्रथिने.

» सोबतच जीवनसत्त्व ए, बी१,बी२, बी३, सी, कॅल्शिअम, क्रोमिअम, कॉपर, आयर्न, मॅग्नेशिअम, मॅगनीझ, फॉस्फरस, झिंक इत्यादी मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. याचा उपयोग तीनशे रोगांवर व व्याधीवर इलाज करण्यासाठी केला जातो.

» बियांचा उपयोग पाणी शुद्ध करण्यासाठी केला जातो.

» जनावरांना रोज तीन किलो वाळलेला पाला खाऊ घातल्यास ६५% पर्यंत दूध उत्पादनात वाढ होते व ३२% पर्यंत वजन वाढते.

» ३२ लिटर पाण्यात एक लिटर पानाचा रस मिसळून पिकांवर फवारणी केल्यास हे plant growth enhancer [वाढ संवर्धक]चे काम करते.

फायदे

» पिकाच्या वाढीस मदत करते.

» कीड व रोगास जास्त प्रतिकारक.

» पिकास जास्त आयुष्य लाभते.

» जास्त व मोठी फळं लागतात व उत्पादनात २०-३५% वाढ होते.

» यात झीटिन नावाचे अँटि एजिंग द्रव्य असल्यामुळे फळे चकाकतात व तजेलदार दिसतात.

» याच्या पानांपासून बायोगॅसही तयार करता येतो.

» बियांपासून तेल काढता येते व याचा उपयोग स्वयंपाकात तसेच उद्योगात विविध कामांसाठी केला जातो.

» अजूनही बरेच काही उपयोग आहेत.
थोडे नवीन जरा जुने