कर्करोग टाळण्यासाठी करा हिरव्या वाटाण्याचं सेवन !

वाटाणा हे एक द्विदल कडधान्य आहे. याचं शास्त्रीय नाव पिसम सॅटिवम असं आहे. वाटाण्याचे पांढरा, हिरवा आणि काळा असे प्रकार आहेत. वाटाणा सोलून तो वाळवला जातो. वाटाणा हा कमी चरबी आणि उष्मांक असलेला पदार्थ आहे.


सोयाबीनच्या तुलनेत वाटाण्यामध्ये कमी कॅलरीज असतात. वाटाण्यात क, अ, जीवनसत्त्व तसंच कॅल्शिअम, फायबरचं प्रमाण असल्याने वाटाणा हा आरोग्याचा एक चांगला स्त्रोत असल्याचं म्हणता येईल.

वजन कमी करण्यास प्रभावी मानला जातो.

 कर्करोग टाळण्यासाठी हिरव्या वाटाण्याचं सेवन करावं.

 लोह, कॅल्शियम म्हणून अनेक खनिजांचे स्रेत आहे. जस्त, तांबे याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली वाढते.

उतारवयात होणा-या त्वचेवरील सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

याच्या सेवनाने त्वचेचं नैसर्गिक आरोग्य सुधारतं.

यातील ‘क’ जीवनसत्त्व संधिवातासारख्या आजाराला प्रतिबंध करण्यास मदत करते.

उच्च फायबर आणि प्रथिनं असल्यामुळे शरीरातील साखर कमी करण्यास मदत करते.

नवजात बाळांना आणि मातांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.

वाटाण्यात फायबर असल्याने पचायला मदत होते.

वाटाण्यामध्ये अ जीवनसत्त्व असल्याने ते त्वचा आणि आरोग्यासाठी अधिक उपयोगी आहे.
थोडे नवीन जरा जुने