मसूर खाण्याचे हे फायदे वाचून थक्क व्हाल !
हे एक द्विदल धान्य आहे. प्रकृतीने उष्ण, शुष्क आणि रक्तवर्धक आहे. रंगाने पिवळी, केशरी, हिरवी, चॉकलेटी किंवा काळीदेखील असते. विविध प्रकारांत उपलब्ध असते. मसूर उसळ आणि डाळींचा नियमित आहारात समावेश केला जातो. त्यात कॅल्शिअम, फॉस्फरस, आयर्न, सोडियम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, सल्फर, क्लोरिन, आयोडिन, अ‍ॅल्युमिनिअम, कॉपर, झिंक, प्रोटिन, काबरेहायड्रेट आणि जीवनसत्त्व ‘ड’ यांचा समावेश असतो.

मसूरची डाळ जाळून त्याचं चूर्ण तयार करून ती दातांवर घासल्याने दातांचे सगळे रोग दूर होतात.

मसूरचं पीठ तुपात किंवा दुधात मिसळून चेह-याला लावल्याने चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात.

 याच्या झाडाच्या पानांचा काढा करून गुळण्या केल्याने गळ्याची सूज कमी होते.

 डाळीचं सूप तयार करून प्यायल्याने आतडय़ांशी संबंधित विकार होत नाहीत.

मसूर जाळून त्याचं चूर्ण करून दुधात घालून सकाळ-संध्याकाळ जखमेवर लावल्याने जखम लवकर भरण्यास मदत होते.

 मसूर डाळीचा आहारात समावेश केल्याने रक्तवृद्धी होण्यास मदत होते. कमी रक्त असलेल्यांनी मसूरचा आहारात नियमित समावेश करावा.

 पचनक्रिया सुधारून पोटाशी संबंधित विविध विकार दूर होण्यास मदत होते.
थोडे नवीन जरा जुने