टेलिमेडिसिन काळाची गरज !टेलिहेल्थ किंवा टेलिमेडिसिन्स म्हणजे दूरस्थ भागातील डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे प्रगत माहिती तंत्रज्ञान/ दूरसंचार यंत्रणा आहे. रुग्णांच्या आरोग्यविषयक माहितीचे व समस्यांचे एका भागातून दुस-या भागात इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने संदेशवहन होऊन त्यांच्या म्हणजेच रुग्णांची चिकित्सालयीन आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी मदत होते.

टेलिमेडिसिन्सच्या विविध माध्यमांचा वापर करणा-या रुग्णांचे दूरगामी रोगनिदान व वैद्यकीय उपचार याच्याशी जसे की – दूरध्वनी व इंटरनेट यासारख्या माध्यमांचा वापर करतात. त्यात रुग्णालये, चिकित्सालये, आरोग्यसेवा व रोगनिदान तंत्र केंद्रं यांच्याशी संपर्क साधून रुग्णांना अतिजलद व गुणवत्ताप्रधान आरोग्यसेवा पुरविण्याची क्षमता असते.

रुग्णांना त्यांच्या आरोग्याच्या समस्यांचे ज्ञान देऊन संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधण्याची सुसाध्य आयुधे पुरविली जातात. वैद्यकीय सेवांचा अभाव असणा-या भागात रोगलक्षणांचे निदान अचूकपणे करण्यासाठी डॉक्टर्स व परिचारिका सेवा पुरविली जाते. आरोग्यसेवांचा लाभ घेणा-या ग्राहकांसाठी ही स्वागतार्ह संधी आहे आणि चिकित्सालयीन उपचारांसाठी टेलिमेडिसिन ही उपकारक अशी उपचारपद्धती भारतात गेल्या दोन वर्षात लोकप्रिय झाली आहे. आरोग्यसेवेची सहज उपलब्धता व जलद सेवापुरवठा याकरिता ही उपयोगी पद्धती आहे.

रुग्णांना याचा उपयोग कसा होईल?

भारतात डॉक्टरांची कमतरता आहे म्हणजेच दर १,७०० रुग्णांमागे एक डॉक्टर अशी अवस्था आपल्याकडे आहे. डॉक्टरांद्वारे पुरवल्या जाणा-या वैद्यकीय सेवांची फलनिष्पतीचे गुणवत्ता नियंत्रण व मूल्यनिर्धारण करणारी कोणतीही पद्धती नाही. निमशहरी किंवा ग्रामीण भागात रुग्णांना वैद्यकीय सेवांचा अत्यल्प लाभ मिळतो किंवा डॉक्टरांना गाठण्यासाठी त्यांना मैलोगणिक प्रवास करावा लागतो. तसेच डॉक्टरांच्या भेटीची वेळ निश्चित करणे हीदेखील वेळेचा अपव्यय करणारी प्रक्रिया आहे.

टेलिमेडिसिन्स हा दुर्धर व्याधीग्रस्त रुग्ण, आजारी व्यक्ती यांना त्यांच्या आरोग्यविषयक वैद्यकीय दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जतन करायला लावणारा मार्ग आहे. टेलिहेल्थमुळे शहरी, निमशहरी व ग्रामीण जनतेला आजारविषयक वैद्यकीय इलाज करण्यासाठीचे एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.

डॉक्टरांना याचा उपयोग

देशभरातील सुमारे २७० वैद्यकीय महाविद्यालयांत शिक्षण पुरे केलेले २८,१५८ डॉक्टर्स दरवर्षी आरोग्यसेवा क्षेत्रात पदार्पण करतात. या नवागत डॉक्टरांना वैद्यकक्षेत्रात आपला पाया भक्कम करणे कठीण होते. दुसरीकडे असे चित्र असते की रुग्णाने एकदा दवाखान्याबाहेर पाऊल ठेवले की तो पुन्हा उपचारांसाठी परतेल याची हमी नसते.

बहुतांशी डॉक्टर आजमितीसही कागद व लेखणीचाच आधार घेत असून ते वैद्यकीय देयके व रुग्णांचे दस्तऐवज जतन करण्यासाठी ते पारंपरिक पद्धती अवलंबित आहेत. टेलिमेडिसिन्समुळे डॉक्टरांना स्थानिकेतर रुग्णांच्या आरोग्यविषयक स्थितीचा दस्तऐवज हा प्रमाणित संगणीकृत नमुन्यात जतन करणे शक्य असते. तसेच रुग्णांकडून वैद्यकीय उपचारांसाठी आकारल्या जाणा-या शुल्काच्या लेख्यांचे काम व वैद्यकीय प्रशासकीय काम करणेदेखील सुकर होते.
थोडे नवीन जरा जुने