एन्डोमेट्रोसिसमुळे वंध्यत्वाला आमंत्रण!


एन्डोमेट्रोसिस ही साधारणत: आढळणारी स्थिती असून, त्यामध्ये गर्भाशयातील अस्तर (एंडोमेट्रिअम) म्हणून काम करणा-या पेशी/उती गर्भाशयाच्या बाहेर आढळतात. या पेशी शरीरातील अन्य कोणत्याही भागात असू शकतात.


एन्डोमेट्रोसिस ही साधारणत: आढळणारी स्थिती असून, त्यामध्ये गर्भाशयातील अस्तर (एंडोमेट्रिअम) म्हणून काम करणा-या पेशी/उती गर्भाशयाच्या बाहेर आढळतात. या पेशी शरीरातील अन्य कोणत्याही भागात असू शकतात. यामुळे वेदनायुक्त पाळी, ओटीपोटातील जुनाट वेदना आणि अंडाशय व टय़ुब्ज सामील होतात तेव्हा सबफर्टिलिंटी असे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

लोकसंख्येमध्ये एन्डोमेट्रोसिसचे प्रमाण मोठे असते आणि प्रामुख्याने प्रजननक्षम वयोगटामध्ये ते अधिक असते. प्रजननक्षम वयोगटातील १० पैकी १ महिलेला एन्डोमेट्रोसिसचा त्रास होतो.

जगभरातील १०% महिलांना एन्डोमेट्रोसिस आहे – म्हणजे जगभर १७६ दशलक्ष. प्रजननक्षमता नसलेल्या महिलांमध्येही एन्डोमेट्रोसिसचे प्रमाण अधिक म्हणजे ३०-५०% आहे. १८-४० वर्षे वयोगटातील अंदाजे २६ दशलक्ष भारतीय महिलांना एन्डोमेट्रोसिसचा त्रास आहे.

एन्डोमेट्रोसिस ही साधारणत: आढळणारी स्थिती असून, त्यामध्ये गर्भाशयातील अस्तर (एंडोमेट्रिअम) म्हणून काम करणा-या पेशी/उती गर्भाशयाच्या बाहेर आढळतात. या पेशी शरीरातील अन्य कोणत्याही भागात असू शकतात – जसे की ओव्हरीज व फॅलोपिअन टय़ुब्ज. ओटीपोटातील आतल्या भागातील अस्तर आणि अगदी आतडी किंवा ब्लॅडरमध्येही.

दर महिन्याला, हार्मोनल प्रभावाखाली या पेशी गर्भाशयातील पेशींप्रमाणेच प्रतिसाद देतात, वाढतात आणि त्यानंतर फुटतात व रक्तस्रव करतात. गर्भाशयातील पेशी पिरिएड म्हणून शरीरातून बाहेर पडतात, पण या रक्ताला बाहेर पडण्यासाठी मार्ग नसतो.

यामुळे जळजळ, वेदना आणि या पेशी साठलेल्या भागात मेदयुक्त उतींची निर्मिती होऊ शकते. शेवटी, यातून वेदनायुक्त पाळी, ओटीपोटातील जुनाट वेदना आणि अंडाशय व टय़ुब्ज सामील होतात तेव्हा सबफर्टिलिंटी असे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

ओव्हरिअन एंडोमेट्रिओमा किंवा साधारणत: चॉकलेट सिस्ट या नावाने ओळखल्या जाणा-या या त्रासाचा फटका एन्डोमेट्रोसिस असलेल्या १७-४४% महिलांना बसतो. अंडाशयामध्ये साठलेले एक्टोपिक एंडोमेट्रिअल सेल्सही पाळीदरम्यान स्रव करतात आणि त्यामुळे अंडाशयावर सिस्ट निर्माण होते. यास चॉकलेट सिस्ट वा एंडोमेट्रिओमा असे म्हणतात.

त्यामध्ये जाडसर, तपकिरीप्रमाणे द्रव असते (जुने सायक्लिकल रक्त), त्यामुळे त्यास ‘चॉकलेट सिस्ट’ असे म्हणतात. सिस्ट १५-२० सेमींपर्यंत वाढू शकते. एंडोमेट्रिओमा अनेकदा आजूबाजूच्या रचनांवर आधारित असते, जसे की, पेरिटोनिअम, फॅलोपिअन टय़ुब्ज व आतडे.

ओटीपोटातील अवयवांचे शरीरशास्त्रानुसार असलेले स्थान बदलू शकते आणि नसíगक प्रजननक्षमता कमी होऊ शकते. यामुळे ओटीपोटातील जुनाट वेदना आणि वेदनादायी शरीरसंबंध असा परिणाम होऊ शकतो.

वंध्यत्वावर उपचार घेण्यासाठी येणा-या तरुणींच्या बाबतीत चॉकलेट सिस्टचे निदान झाले आहे. वंध्यत्वाविषयी तपासण्या करण्यासाठी येणा-या रुग्णांना काही वेळा, त्यांच्यातील एन्डोमेट्रोसिसने तिसरा वा चौथा इतका पुढचा टप्पा गाठला असल्याची कल्पना असते. हा त्रास १८-४० वर्षे या प्रजनन काळामध्ये दिसून येतो आणि किशोरवयीनांमध्येही हे प्रमाण लक्षणीय आहे. याची प्रमुख वैशिष्टय़े आहेत, अत्यंत वेदनादायी पाळी, ओटीपोटातील जुनाट वेदना, पाळीच्या चक्रादरम्यान रक्तस्त्राव, संभोगानंतर व पूर्वी वेदना, गर्भ राहण्यात अडचणी आणि काही वेळा मल/मूत्र विसर्जनाच्या वेळी त्रास. अशा वेदनांमुळे कामातून वा शाळेतून घरी जावे लागले तर नेमकी काय समस्या आहे हे पाहण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक ठरेल.

बहुतांशबाबतीत, चॉकलेट सिस्टचे अस्तित्व तपासण्यासाठी आणि अन्य प्रकारच्या ओव्हरिअन सिस्टपासून त्याचे वेगळेपणे समजून घेण्यासाठी अल्ट्रासोनोग्राफी केली जाते. ‘एन्डोमेट्रोसिसचे प्रमाण तपासण्यासाठी सर्वोत्तम निदान प्रक्रिया म्हणजे लॅपरोस्कोपी.’ चॉकलेट सिस्ट/ओव्हरिअन एंडोमेट्रिओमा झालेल्या वंध्य महिला एंडोमेट्रिओमा वॉलचो ड्रेनेज व इलेक्ट्रोकोग्युलेशनऐवजी एंडोमेट्रिओमा कॅप्स्युल शस्त्रक्रिया, लॅपरोस्कोपिक एक्सिजनचा पर्याय निवडत असून यामुळे नसíगक गर्भधारणेचे प्रमाण वाढत असल्याचे दिसते
थोडे नवीन जरा जुने