डायबिटीज नियंत्रित राहील, फक्त 'हे' करारोज आपल्याला लहान-लहान समस्यांना सामोरे जावे लागते. या समस्या दूर करण्यासाठी जर आपल्याला पारंपारिक उपाय मिळाले तर किती चांगील गोष्ट आहे. आज आपण पाहुया आपल्या लहान-लहान समस्या आणि त्याचे काही पारंपारिक उपाय

मग ती साखरेत मुंग्या होण्याची समस्या असो, कारमध्ये दुर्गंधी येण्याची समस्या किंवा तुमच्या आरोग्याविषयीची समस्या या सर्वांसाठी पारंपारिक ज्ञानाच्या माध्यमातुन काही उपाय आहेत. चला तर मग जाणुन घेऊ असे काही सोपे आणि पारंपारिक उपाय...

1. सुपारीने दात चमकदार होतात

सुपारीला बारीक करुन त्यामध्ये 5 थेंब लिंबूचा रस आणि थोडेसे काळे मीठ टाका. या मिश्रणाने रोज दात घासा. तुमचे दात चमकायला लागतील.

2. नखांची चमक आणि सुंदरता

एरंडीच्या तेलाने नखांना थोडा वेळ मालिश करा, रोज झोपण्याअगोदर असे केल्याने नखाची चमक वाढेल आणि नखे सुंदर दिसतील.

3. कारमध्ये येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी
एका लहान वाटीत सफरचंदाचे तुकडे करुन ठेवा आणि ही वाटी गाडीच्या सीट खाली फ्लोरवर ठेवून द्या. एक दोन दिवसात हे तुकडे वाळतील, पुन्हा एकदा ही प्रक्रिया करा, हळु-हळू कार मधून येणारी दुर्गंधी दूर होईल.

4. मुंग्या पळवण्यासाठी लवंग

साखरेच्या डब्यात किंवा तांदूळांमध्ये आपण नेहमी मुंग्या झालेल्या पाहतो. या मुंग्यापासुन सर्वच त्रस्त असतात. यापासुन सुटका मिळवण्यासाठी तुम्ही डब्यामध्ये 2-4 लवंग टाकुन द्या मग पहा मुंग्या तुमच्या डब्यात येणारच नाही. अदिवासी लोक स्वयंपाक बनवल्यानंतर त्याच्या जवळ 1-2 लवंग स्वयंपाका जवळ ठेवतात.

5. बुटांना चमकवण्याची देशी पध्दत

4-5 जास्वंदाच्या फुलांना आपल्या बुटांवर घासा आणि मग पाहा तुमचे बुट कसे चमकतात.

6. मीठ ओले होणे

वातावरणातील बदलांमुळे अनेक वेळा मीठ ओले होते. मीठाच्या कंटेनरमध्ये 10-15 तांदूळाचे कच्चे दाने टाका. मीठाला ओलावा येणार नाही.

7. कॉलेस्ट्रॉल कमी करणे

तुम्हाला माहिती आहे की, लसुनच्या फक्त दोन पाकळ्या नियमित खाल्ल्याने शरीरातील खरतनाक कॉलेस्ट्रॉल कमी होतात. यासोबतच हे उच्च रक्तदाब कमी करण्यात मदत करते. लसुनच्या दोन पाकळ्या सोलून गिळून घ्या. असे नियमित उपाशापोटी करा आणि एक ग्लास पाणी पिऊन घ्या. हे कॉलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्यात सोबतच तुमच्या उच्च रक्तदाबाला सामान्य करण्यात सहायक असेल. अदिवासींप्रमाणे सतत 3 महिने असे केल्याने शरीरात ट्युमग होण्याची शक्यता कमी असते.

8. डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी उपाय

एक चमचा जवसाच्या बियांना चावा आणि एक ग्लास पाणी सेवन करा. रोज सकाळी उपाशापोटी आणि रात्री झोपण्याअगोदर असे करावे.
थोडे नवीन जरा जुने