जर्दाळू
जर्दाळू हेही एक फळ असून ते अर्धाल्म वर्गात मोडते. कच्चे असताना ते थोडे आंबट असते. पण पिकताना त्यातील आम्लता कमी होऊन साखर वाढत जाते. हे अतिशय पौष्टिक आणि बलवर्धक फळ असून ते लोकप्रिय आहे. जर्दाळू हे कवची फळ आहे. मात्र ही कवची त्याच्या गराच्या आत बी भोवती असते.
जर्दाळू हा गोल अगर किंचित लांबट असून काहीसा चपटा असतो. आकार थोडा पीचसारखा, पण बराच लहान, रंग पिवळट असतो. फळ झाडावरच पिकू लागल्यास पीचसारखाच त्याचा मंद पण सुरेख गंध आसपास दरवळतो.

ग्रीक वैद्यकात जर्दाळूला औषधी अन्न म्हणून उल्लेखले आहे, तर रोमन लोक प्रणयाची देवता व्हीनस हिचे फळ म्हणून जर्दाळूकडे पाहतात. युरोपात जर्दाळूची ओळख अ‍ॅलेक्झांडरच्या काळात झाली.

मध्यपूर्वेतही जर्दाळू त्याच्या चवीमुळे व उत्तेजक सुगंधामुळे फार लोकप्रिय आहे. जर्दाळूमध्ये अनेक मूल्ये आहेत. इतर कोणत्याही सुक्या मेव्यापेक्षा अधिक मूल्ये तिच्यात आहेत. जॅम, जेली, मार्मालेड, मिठाई यात जर्दाळूचा वापर खूप प्रमाणात केला जातो.

ताज्या फळात नैसर्गिक साखर, ‘अ’ जीवनसत्त्व आणि कॅल्शियम विपुल प्रमाणात असते.

यातून बी कॉम्प्लेक्स, रिबोफ्लेविन, निअ‍ॅसिन तसेच ‘क’ जीवनसत्त्वही मिळते.

जर्दाळूची बी प्रथिने व मेद यांनी परिपूर्ण असते.

जर्दाळूतील तेल हे रासायनिक व इतर दृष्टयाही बदामाच्या तेलासारखे असते.

जर्दाळूचे फळ बी, कवच, तेल आणि त्याची फुले यांचा वापर औषधी म्हणून होत आला आहे.

चीनमध्ये विशिष्ट प्रदेशातील जर्दाळूच्या झाडाच्या सालीपासून बनवलेले औषध जर्दाळूतील सोने या नावाने ओळखले जाई. आयुष्य वृद्धीसाठी हे औषध प्रसिद्ध आहे.

स्त्रियांच्या रोगावर जर्दाळू हे अधिक उपयुक्त सिद्ध होत असल्याचे चीनमध्ये मानले जाई. म्हणून जर्दाळूची फुले स्त्रियांच्या प्रसाधनात बरीच वापरली जात.

जर्दाळूच्या सालीच्या तेलात बदामाच्या तेलाचे सर्व गुणधर्म असून ते गुंगी आणण्यासाठी, आचके थांबण्यासाठी सर्वत्र वापरले जाते.
मलावरोधावर एक सौम्य रेचक म्हणून जर्दाळू चांगला आहे.

 जर्दाळूची अल्कलीयुक्त प्रतिक्रिया तो पोटात जाताच सुरू होते. ते पचनाला मदत करतात. म्हणून जर्दाळू हे जेवणाआधी खावेत.

झाडावर पिकलेल्या जर्दाळूचे ‘मार्मालेड’ हे मानसिक दुर्बलतेमुळे होणा-या अपचनावर उपयुक्त आहे.

 जर्दाळूमध्ये लोह विपुल प्रमाणात असल्याने रक्तक्षयावर ते उत्तम औषध आहे.

भरपूर प्रमाणात जर्दाळू खाल्ल्यास रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

ताज्या जर्दाळूच्या रसात मध किंवा साखर मिसळून दिल्यास त्याचा तापात खूप उपयोग होतो.

 डोळे, आतडी, यकृत, हृदय आणि मज्जातंतू यांना खनिज व जीवनसत्त्व मिळून बळ येते.

 जर्दाळूच्या पानांचा रस काढून तो त्वचारोगात वापरला जातो. खरूज, इसब, सौरदाह, कंड सुटणे यावर तो वापरल्यास फायदा होतो.

जेवणानंतर जर्दाळू खावा. सहसा जर्दाळू वाळवून अधिक प्रमाणात खाल्ले जातात. त्यामुळे ते सहज पचतात.
थोडे नवीन जरा जुने