फॅमिली डॉक्टरची आवश्यकता किती आहे?


फॅमिली डॉक्टरची गरज प्रत्येक कुटुंबाला आवश्यकच आहे किंवा असा एक डॉक्टर जो मित्र म्हणून तुमच्या कुटुंबासोबत जोडलेला असावा.

एक डॉक्टर या नात्याने तो तुमच्या आजाराशीच नाही तर फॅमिलीतले ताणतणाव, नाती आदी बाबत जाणकार असतो, त्याला तुमच्या आजारामागच्या कारणांचे योग्य निदान करायला मदत होते. अनेकदा फॅमिली डॉक्टर हा आपल्याकरिता फर्स्ट डिसिजन म्हणून काम करीत असतो. 

प्रत्येक आजाराला आपण वेगवेगळय़ा ठिकाणी जात राहिलो तर आपल्या शरीरावर औषधांचे विविध प्रयोग होत राहतात, एकदा का तुमच्या आरोग्याविषयीच्या बारीक सारीक गोष्टी फॅमिली डॉक्टरला माहीत झाल्या तर तुमच्यावर उपचार करणे, त्याला सोपे जाईल. हल्ली वेळ कोणाकडेच नसतो, 

प्रत्येकजण आपापल्या व्यापात असतो, अनेकदा घरांतल्या वृद्धांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही, अशावेळी फॅमिली डॉक्टर असेल तर तुमचे काम थोडय़ा प्रमाणात तरी सुसह्य होते, त्यामुळे फॅमिली डॉक्टरची गरज एक आरोग्यमित्र म्हणून प्रत्येकालाच आहे.
थोडे नवीन जरा जुने