धोका ग्रीवा कर्करोगचा


ग्रीवेमध्ये पेशींची प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाल्याने हा विकार जडतो. बैठी जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अनारोग्यकारक सवयी, लैंगिक संबंध कमी वयात सुरू करणे, धुम्रपानाचे व्यसन यामुळे शहरी महिलांना ग्रीवेचा कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. पूर्वी गरीब महिलांना जडणारा विकार म्हणून याची ओळख होती, पण आज महानगरे आणि विकसित शहरांमध्ये मानेच्या कर्करोगाच्या अनेक रुग्णांची नोंद होत आहे. ग्रीवेचा कर्करोग हा भारतीय महिलांना सर्वात जास्त प्रमाणात होणारा कर्करोग आहे.
बैठी जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या अनारोग्यकारक सवयी, लैंगिक संबंध कमी वयात सुरू करणे, धुम्रपानाचे व्यसन यामुळे शहरी महिलांना ग्रीवेचा कर्करोग होण्याचा धोका वाढला आहे. पूर्वी गरीब महिलांना जडणारा विकार म्हणून याची ओळख होती, पण आज महानगरे आणि विकसित शहरांमध्ये मानेच्या कर्करोगाच्या अनेक रुग्णांची नोंद होत आहे.

ग्रीवेचा कर्करोग हा भारतीय महिलांना सर्वात जास्त प्रमाणात होणारा कर्करोग आहे. भारतात १५ वर्षावरील महिलांची लोकसंख्या सुमारे ३६५.७१ दशलक्ष असून त्यांना ग्रीवेचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. सध्या व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार दरवर्षी ग्रीवेच्या कर्करोगाची सुमारे १,३२,००० नवीन प्रकरणे समोर येतात आणि या रोगामुळे दरवर्षी ७४ हजार व्यक्तींचा मृत्यू होतो.

ग्रीवेच्या कर्करोगामुळे जगभरात होणा-या मृत्यूंपैकी एक तृतियांश मृत्यू हे भारतीयांचे असतात. २.५% भारतीय महिलांना हा विकार जडण्याचा धोका आहे आणि १.४% भारतीय महिलांचा मृत्यू ग्रीवेच्या कर्करोगामुळे होण्याची शक्यता आहे.

ग्रीवेमध्ये पेशींची प्रमाणापेक्षा अधिक वाढ झाल्याने हा विकार जडतो. देशभराचा विचार करता महिलांना होणा-या कर्करोगामध्ये ग्रीवेचा कर्करोग झालेल्या महिलांचे प्रमाण २४% आहे तर स्तनांचा कर्करोग होणा-या महिलांचे प्रमाण २०% आहे. आजच्या घडीला शहरी महिलांचा विचार करता त्यांची जीवनशैली व पोषक आहारामध्ये झालेली घट ही ग्रीवेचा कर्करोग होण्याची प्रमुख कारणे आहेत.

शहरी भागात राहणा-या महिलांच्या बैठय़ा जीवनशैलीमुळे जंकफूडचे सेवन करण्यात येते, ज्यात पोषक घटक कमी असतात. परिणामी, अशा प्रकारचे धोके वाढतात. पहिला- लैंगिक संबंध खूप लहान वयात झाल्यास आणि विविध जोडीदारांसोबत झाल्यास हा विकार जडण्याचा धोका वाढतो. अस्वाभाविक रक्तस्त्राव, नेहमीपेक्षा अधिक उत्सर्जन, ओटीपोटात वेदना होणे, लघवी करताना वेदना होणे आणि अनपेक्षित रक्तस्त्राव होणे ही ग्रीवेच्या कर्करोगाची लक्षणे असू शकतात.

त्याचप्रमाणे लोकांमध्ये कर्करोगाबद्दल एक अनामिक भीती असते. ग्रीवेची नियमित चाचणी करण्याबाबत महिलांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. वयाची ६५वष्रे पूर्ण केलेल्या महिलांनी ५० व्या वर्षानंतर ग्रीवेच्या कर्करोगाची चाचणी केली नसेल किंवा अलीकडच्या काळात त्यांच्या काही अस्वाभाविक चाचण्या झाल्या असतील तरच ग्रीवेची चाचणी करून घ्यावी.

ज्या महिलांनी लैंगिक संबंध ठेवलेलेच नाहीत, त्यांना हा कर्करोग होण्याचा धोका अत्यंत नगण्य प्रमाणात असतो. त्यामुळे अशा महिलांनी ग्रीवेच्या कर्करोगाची चाचणी करण्याची आवश्यकता नाही. गरोदरपणात ग्रीवेची चाचणी शक्यतो करू नये. प्रसूतीनंतर ही चाचणी करण्यासाठी किमान तीन महिन्यांची प्रतीक्षा करावी.

पॅप स्मिअर चाचणीचे निष्कर्ष सकारात्मक (पॉझिटिव्ह) असतील तर रुग्ण परत येत नाहीत. ग्रीवेच्या कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी महिलांनी या विकारासाठीची चाचणी करून घ्यावी आणि त्यांच्या परिवाराकडून त्यांना सहकार्य मिळावे यासाठी व्यापक प्रमाणावर जागरूकता मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे.
थोडे नवीन जरा जुने