उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासोबतच या आजारांपासून दूर ठेवतील हे पेय
उष्णता दिवसेंदिवस वाढत असून लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवत आहे आणि यामागचे कारण शरीरातील पाणी कमी होणे हे आहे. घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, खूप घाम, थकवा येणे इ. समस्या उन्हाळ्यात होणे सामान्य गोष्ट आहे. या सर्व समस्यांपासून दूर राहण्यासाठी काही थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही घरगुती ठाण पेयांबद्दल सांगत आहोत.

जलजीरा -
उन्हाळा सुरु होताच उत्तर भारतात ठिकठिकाणी जलजीरा विकणारे लोक दिसतात. हे पेय उत्तर भारतात खूप प्रचलित आहे. यामध्ये जिरे, काळे मीठ, पुदिना आणि पाणी यांचे एकत्रित मिश्रण असते. जलजीरा पावडरही बाजारात सहज उपलब्ध होते. जलजीरा पिल्याने पोटाशी संबधित आजार लवकर बरे होतात.


नारळ पाणी -
नारळ पाण्यात व्हिटॅमिन आणि मिनरल भरपूर प्रमाणात असतात. विविध आजारांवर नारळ पाणी एक उत्तम उपाय आहे. आयुर्वेदात नारळ पाण्याला खूप महत्व आहे. उन्हाच्या दिवसांत स्वत:ला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी चांगला पर्याय ठरतो. नारळ पाणी एनर्जी ड्रिंक्ससोबत सौंदर्य समस्या दूर ठेवण्यास सक्षम आहे. नारळ पाणी महिलांच्या आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. त्वचा कोरडी होत असेल तर नारळ पाणी पिणे केव्हाही चांगले.

ऊसाचा रस
ऊसाचा रस गोड, थंड आहे. तत्काळ शक्ती देणारा, तरीही कमी कॅलरी असणारा आहे. वजन कमी करू इच्छिणा-यांसाठी हे उत्तम पेय आहे. मधुमेह असणा-या व्यक्त्तींनी साखरेऐवजी ऊसाच्या रसाचा वापर करावा. यामध्ये कॅल्शिअम, क्रोमियम, कोबाल्ट, फॉस्फरस, पोटॅशियम, जिंक, मिनिरल्स, आयरन, व्हिटॅमिन ए, सी, बी1, बी2, बी3, बी4, बी५ आणि बी6, प्रोटीन अँटीऑक्सीडेंट्स आणि फायबर चांगल्या प्रमाणात असते.आंब्याचा रस
आंब्याचा रस उन्हाळ्यातील सर्वात उत्तम पेय आहे. आंब्याच्या रसात साखर आणि अ व क जीवनसत्त्वे पुष्कळ प्रमाणात असतात. आंब्याचा रस, तूप, दूध, असे रोज खाल्ल्याने दुर्बल व्यक्तींचे वजन वाढून प्रतिकार क्षमता निर्माण होते. आंब्याचा रस तृप्तीकारक, बलवर्धक, रुचिप्रद व वातनाशक आहे.


ताक -
जेवणानंतर ताकाचे सेवन शरीरासाठी उन्हाळ्यात लाभदायक आहे. हे उन्हाळ्यातील सर्वात स्वस्त आणि प्रभावी पेय आहे. ताक पिल्याने पोटाला थंडावा मिळतो. अपचनाची समस्या दूर होते.मोसंबी -
हे पिवळट हिरव्या रंगाचे एक लिंबू वर्गातील आंबट-गोड फळ आहे. उन्हाळ्यात मोसंबीचे ज्यूस पिणे आरोग्दायी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला उर्जा मिळते. मोसंबी ज्यूसमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते.


शरीराला थंडावा देण्यासाठी उन्हाळ्यात अवश्य करा या पेयांचे सेवन
टरबूजामध्ये बीटा-कॅरोटीन आणि अँटीऑक्सीडेंटचे प्रमाण जास्त असते. यामुळे याच्या सेवनाने शरीर नेहमी सशक्त राहते. त्वचेवरील सुरकुत्या नष्ट होतात.

१ कप टरबूजाच्या रसामध्ये १ चिमुटभर काळे मीठ टाकून सेवन करावे. यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या दूर होण्यास मदत होते.

टरबूज फॅट फ्री आहे. तसेच यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे पोट लवकर भरते. तुम्ही डायटिंगवर असाल तर टरबूज खाऊन भूक भागवू शकता.


उन्हाळ्यात कैरीच पन्ह पिल्याने खूप लाभ होतो. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो यावर कैरीचे पन्हं पिणे हा उत्तम उपाय आहे. पन्हं प्यायल्यामुळे उन्हाचा त्रास खूपच कमी होतो.


उन्हाळ्यात फळांचा रस शरीरासाठी लाभदायक ठरतो परंतु पाण्याशी स्पर्धा इतर कोणतेही पेय करू शकत नाही. पाण्यामुळे शरीरातील तापमान कायम राहते, पोट साफ राहते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. उन्हाळ्यात पाणी पिल्याने उष्माघाताचा धोका कमी होतो.
थोडे नवीन जरा जुने