आरोग्यदायी व्यायाम आर्टिस्टिक योगा




आधुनिक जीवनशैलीमुळे प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे झाले आहे. आपल्या आरोग्यासाठी देखील लोकांना वेळ काढण्यासाठी नाकीनऊ येत आहेत, पण वाढत्या समस्यांमुळे अनेक जण व्यग्र वेळापत्रकात सुद्धा वेळ काढून व्यायाम करत आहेत. त्यांना आर्टिस्टिक योगा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
आर्टिस्टिक योगाला आपल्या देशात अलीकडे जास्त प्रसिद्धी मिळत आहे. यात योगाच्या विविध मुद्रांसोबत अनेक स्पोर्ट्स कसरतींचा समावेश असतो. यामध्ये व्यक्ती खेळता खेळता स्वत:ची शारीरिक स्थिती चांगली ठेवू शकतो.

प्रत्येक सुखसुविधेसोबत आता फिटनेससाठी व्यायाम एक स्टाइल स्टेटमेंट झाले आहे. जो व्यक्ती जेवढा फिट तेवढा तो हिट ठरत आहे. परिणामी फिटनेस चांगला राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. आज आर्टिस्टिक योगा युवक आणि प्रौढ दोघांसाठी चांगला व्यायाम ठरतो.

वजन कमी करणे आणि शरीर सूडौल बनवणे ही यांची मुख्य उद्दिष्टे आहेत व्यायाम करणार्‍यांना स्वत:चे वजन कमी करून शरीर सूडौल बनवायचे असते. यात याच गोष्टींना जास्त प्राधान्य देण्यात आले आहे. सोबत तणाव कमी करणे, पाठदुखीपासून मुक्ती मिळवण्यासाठी हा योगा उपयुक्त ठरतो. हा योगा स्नायू, ग्रंथी आणि मेंदूवर परिणाम करत असल्याने व्यक्तीला जास्त ताजेतवाणे वाटते.






हा प्राचीन योगाचा आधुनिक प्रकार आहे. यात शरीर सूडौल ठेवण्यावर भर दिला जातो. सोबत काही खेळातील प्रकार सुद्धा यात वापरले जातात. यात संगीताला देखील जास्त महत्त्व आहे. लगेच परिणाम दिसत असल्याने हा जास्त लोकप्रिय होत आहे.
थोडे नवीन जरा जुने