या हॉलिवूड स्टारलाही कोरोना ची झाली लागण



अमेरिकन अभिनेत्री लॉरा बेल बंडी हिची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. ३८ वर्षीय लॉराने या बातमीला व्हीडिओ शेअर करीत दुजोरा दिला आहे. ती व्हीडिओत म्हणते, हॅलो, मी कोविड-१९ टेस्ट केली ती पॉझिटीव्ह आली आहे, हे मला तुम्हाला सांगायचे आहे. मला कोरोना व्हायरस आहे. घाबरण्याची गरज नाही. 

मी ठिक आहे. मी सर्व काळजी घेत आहे. डॉक्टरांनी सुचवलेल्या सर्व हेल्थ एक्सपर्टशी मी बोलत आहे. मी काही काळापासून झाडपाल्याचे सेवन करीत आहे. यानंतर आपला अनुभव सांगताना ती म्हणते, लक्षणे खूप सामान्य होती. हे मागील काही आठवड्यापासून सुरू होते. डोकेदुखी, घसा बसणे, छातीत दुखणे आणि श्वास घ्यायला त्रास होत होता.
थोडे नवीन जरा जुने