निरोगी राहायचे असेल तर ही माहिती तुमच्यासाठीच !

‘देही आरोग्य नांदते, भाग्य नाही यापरते..’ असं म्हटलं जातं. ते खरंच आहे. कारण कोणालाही कुठलाही आजार न होणं म्हणजे त्या व्यक्तिसाठी हे चांगलंच असतं. अशी व्यक्ती ही आजच्या जमान्यात भाग्यदायीच म्हटली पाहिजे. कारण आपण पाहतो सध्य कित्येक लहान-मोठी मंडळी कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रस्त असतो. आपल्याला काही होउ नये म्हणून आपण आपली काळजी घेतो. मात्र शरीराच्या बाह्य स्वच्छतेबरोबरच शरीराची अंतर्गत स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते. ही अंतर्गत स्वच्छता केली तरच आपण निरोगी राहू शकतो.


यकृतामधून दररोज नको असलेले द्रव्य बाहेर पडत असतात. मात्र पदार्थावाटे शरीरात साचणारी नको असलेली द्रव्यही बाहेर फेकणं गरजेचं असतं. म्हणून असा आहार घ्या जो यकृताला त्याचं कार्य सुरळीत करायला मदत करेल. जेणेकरून तुमची पाचनक्रिया सुधारेल. अँटिऑक्सिडंट पदार्थाचा समावेश करा.

भरपूर प्रथिनं असलेले पदार्थाचं सेवन करा. त्यातील अमिनो अ‍ॅसिडमुळे शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर पडतात.

वाफवलेल्या भाज्यांचं सेवन करा.

थोडा व्यायाम करा. कारण व्यायामामुळेही अँटिऑक्सिडंट बाहेर पडतात.

 गरम पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून दररोज सकाळी प्यावं. म्हणजे तुमची पचनशक्ती सुधारेल. तसंच बद्धकोष्ठतेचा त्रासही कमी होईल.

ग्रीन टीचं भरपूर प्रमाणात सेवन करा. ग्रीन टी अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते.

दररोज किमान ग्लासभर तरी दूध प्यावं. त्यात भरपूर पोषणमूल्य असतात, जी हाडं मजबूत करतात. तसंच शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर टाकतात.

 कॉफीपासून लांब राहा. कॉफीच्या सेवनाने शरीराला आवश्यक असणारी पोषणमूल्य मिळत नाहीत.

भरपूर प्रमाणात पाणी प्या. पुरुषांनी किमान ३ लिटर आणि महिलांनी २.५ लिटर पाणी पिणं आवश्यक आहे. शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर टाकली जातात.

आहारात फायबरयुक्त पदार्थाचा समावेश करावा. कारण फायबरयुक्त पदार्थामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर आणि ओबेसिटी या आजारांची शक्यता कमी होते.

तुम्हाला आवश्यक असणारी जीवनसत्त्व तुमच्या आहारातून मिळतात का, याकडे लक्ष द्या. जीवनसत्त्व मिळणा-या पदार्थाचा आहारात समावेश करा.

शरीराला नको असलेली द्रव्य बाहेर टाकण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकतात.

थंडगार बिया आणि साल काढलेलं कलिंगडाचा गर घ्या. आणि एक सेंटिमीटर इतका साल काढलेला आल्याचा तुकडा आणि चार बर्फाचे तुकडे मिक्सरमध्ये एकत्र करा. आता हा ज्युस सव्‍‌र्ह करा.

कलिंगड आणि पुदिना यांच्या मिश्रणामुळे पाणी शरीराबाहेर फेकायला मदत होते.

त्याचप्रमाणे काकडी आणि लिंबू, स्टॉबेरी-काकडी-लिंबू आणि पुदिना या मिश्रणामुळेही शरीराबाहेर पाणी फेकलं जातं.
थोडे नवीन जरा जुने