पोटाजवळची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही विविध उपाय केले पण फायदा झाला नाही ? 'हे' नक्की वाचा


शरीरावर जर जास्त प्रमाणात चरबी असेल तर यामुळे तुमचा लुक बदलतो आणि ही विविध समस्या निर्माण करू शकते. पोटाजवळची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही विविध उपाय केले परंतु हे उपाय नियमितपणे करणे आवश्यक आहेत, जे तुम्हाला शक्य नाही. 

आज आम्ही तुम्हाला असे काही उपाय सांगत आहोत, जे सोपे असण्यासोबतच नेहमीसाठी तुम्हाला या समस्येतून मुक्त करतील.

तणाव घेऊ नका

तणाव घेतल्याने डोक्यामध्ये कार्टिसोलचा स्राव होतो. हा हार्मोन शरीरातील चरबीचे प्रमाण वाढवण्याचे काम करतो, विशेषतः पोटाच्या जवळपासची चरबी. यामुळे तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. ध्यान, योगाच्या माध्यमातून तणावाला दूर ठेवणे शक्य आहे.

बॉलच्या मदतीने करा व्यायाम

जर तुम्हाला तुमचे पोट कमी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला बॉलच्या मदतीने व्यायाम करावा लागेल. पाठीवर झोपून गुडघे 90 अंशावर करा. गुढघ्याच्यामध्ये बॉल ठेवून हळू-हळू श्वासोश्वास करत पुढे येत पायांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. हा व्यायाम 15 मिनिट करा. हा एक सोपा व्यायाम प्रकार असून यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.


साखरेचे प्रमाण कमी करा

साखरेचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास विविध प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. वजन वाढीसाठी साखर मुख्य कारण आहे. शरीरात साखरेचा स्तर वाढल्यास मधुमेह आजार होण्याची शक्यता राहते. यामुळे साखरेचे प्रमाण कमी करा.


मिठाचे सेवन

काही लोकांना असे वाटते की, जास्त मीठ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहते. परंतु आहारातील जास्त मीठ तब्येत खराब करू शकते. मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोट फुगते. जास्त स्पायसी फूड, स्नॅक्स यामध्ये मीठ जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे वजन कमी होत नाही.


आहाराकडे द्या लक्ष

आहाराकडे दुर्लक्ष आणि जेवणाचा अनियमितपणा या गोष्टींमुळे चरबी वाढते. फ्लॅट टमी मिळवण्यासाठी व्यायामासोबतच आपल्या डायटकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. डायट प्लान तयार करताना त्यामध्ये प्रोटीन आणि भरपूर पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. या व्यतिरिक्त चांगल्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचे सेवन करावे.


चावून-चावून खा

अन्न चांगल्याप्रकारे चावून-चावून खावे. अनेक शोधांमध्ये हे सिद्ध झाले आहे की, अन्न चावून-चावून खाल्ल्याने ते सहजपणे पचते आणि पोटाच्या जवळपास अतिरिक्त चरबी जमा होत नाही. यामुळे अन्न शांतपणे आणि 32-36 वेळेस चावून खावे.


ग्रीन टी

जर तुम्हाला चहा आणि कॉफी पिण्याची खूप सवय असेल तर कॅफिनच्या सेवनापेक्षा तुम्ही ग्रीन टी सेवन करा. यामुळे लठ्ठपणा वाढत नाही. ग्रीन टी कॅमेलिया सायनेंसिसची पाने वाळवून तयार केला जातो. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.


भरपूर हसा

तुमच्या अॅब्ससाठी हसणे खूप लाभकारी ठरू शकते. हसल्यामुळे शरीरातील सर्व आजार दूर होतात आणि पोटावर चरबीसुद्धा जमा होत नाही. तुम्ही जेवढ्या वेळेस हसाल, तुमच्या अॅब्सचे मसल्स तेवढेच जास्त मजबूत होतील.


शांत झोप

भरपूर झोप घेतल्यानेही पोटाची चरबी कमी होते. असे मानले जाते की, तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर तुमची तब्येत ठीक नाही. झोप विविध आजारांना दूर ठेवण्यास मदत करते. पर्याप्त झोप आपल्या भुकेचे हार्मोन घेर्लीन आणि लेप्टिनला नियंत्रित करते. योग्य पद्धतीने न झोपणाऱ्या व्यक्तीला जास्त भूक लागते आणि याचा प्रभाव वजनावर पडतो. अमेरिकेतील एक शोधानुसार, पर्याप्त झोप आणि तणावापासून दूर राहणारे लोक वजन कमी करण्यात जास्त यशस्वी ठरले आहेत.
थोडे नवीन जरा जुने