हाडे कुमकुवत आहे का? मग हे कराआधुनिक जीवनशैलीमध्ये साखरेपासुन बनलेल्या पदार्थांमुळे (चॉकलेट, केक, आइसक्रीम कोल्ड ड्रिंक्स इत्यादी) शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेची समस्या असते. आश्चर्यांची गोष्ट म्हणजे फक्त वयस्कर माणसांमध्येच नाही तर तरुण लोकांमध्येही ही समस्या एक सामान्य गोष्ट आहे. 

कॅल्शियम आपल्या हाडांना मजबूत करण्यासाठी आणि ब्लड सेल्सला बनवण्यासाठी मुख्य भूमिका निभावतात. आपल्यातील अनेक लोक कॅल्शियम मिळवण्यासाठी दूध, चीज, बटर, पनीर आणि दूस-या डेयरी प्रोडक्टसचा वापर करतात. परंतु ज्या लोकांना दूध, दही आणि पनीर खाणे आवडत नाही त्यांचे काय? 

वाढत्या वयात मुलांना कॅल्शियमची खुप आवश्यकता असते आणि लहान मुलांना दूध आवडतच नाही. अशात आज आम्ही अशा काही पदार्थांविषयी सांगत आहोत ज्यामुळे त्यांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होईल.

1. पाले भाज्या


कोणत्याही प्रकारच्या पालेभाज्यांमध्ये आणि ब्रोकलीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते.

2. अंजीर

अंजीर हे सुकामेव्यात टेस्ट असण्यासोबतच अनेक गुणांनी युक्त असते. यामध्ये कॅल्शियम आणि आयरन अधिक प्रमाणात असते. सोबतच फायबरसुध्दा असते.

3. भेंडी

एक वाटी भेंडी खाल्ल्याने तुम्हाला 40 ग्राम कॅल्शियम मिळेल. जर तुम्ही आठवड्यातुन दोन वेळा भेंडी खाल्ली तर यामुळे तुमचे दात निरोगी राहतील.

4. ओटमील

हे खाल्लायने फायबर आणि कॅल्शियम दोन्हीही मिळते. यामुळे महिलांनी हे ब्रेकफास्टमध्ये अवश्य खावे.

5. सारडाइन

सारडाइन एक समुद्रातील मासा आहे. ज्यामध्ये 33 टक्के कॅल्शियम असते. आठवड्यातुन 1 वेळा हे अवश्य खा.
6. बदाम
बदामाचे दूध आणि बदामामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. सोबतच यामध्ये अन्य पोषकतत्त्वही उपलब्ध असते.

7. संत्री

ज्या आंबट फळांमध्ये सिट्रस एसिड असते, त्यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन उपलब्ध असते. तुम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि आजारांना दूर ठेवण्यासाठी संत्री आणि लिंबूचे सेवन आठवड्यातुन दोनदा अवश्य करावे.

8. तिळ

एक चमचा तिळामध्ये एक ग्लास दूधा येवढे कॅल्शियम असते.


9. सोया मिल्क

यामध्ये दूधा येवढे कॅल्शियमतर नसते, परंतु एक ग्लास दूधाने 300 एमजी कॅल्शियम मिळते.

10. चीज
प्रत्येक प्रकारची चीज मग ती,मरमेसन असो वा मॉजरेला किंवा शैड्डर, यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते.
थोडे नवीन जरा जुने