यकृताच्या कर्करोगासाठी कारणीभूत....


विषाणूमुळे होणारा हेपटायटिस ही चिंतेची बाब होऊ लागली आहे. हा संसर्गजन्य रोगांचा समूह आहे. त्याला हेपटायटिस ए, बी, सी, डी आणि ई असे म्हणतात. जगभरात लक्षावधी व्यक्तींना या रोगाची लागण होत आहे. यापैकी हेपटायटिस बी आणि सी हे गंभीर स्वरूपाचे यकृताचे विकार आणि यकृताच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत.

बैठी जीवनशैली आणि मधुमेह, स्थूलपणा यासारखे विकार हे चरबीयुक्त यकृतासाठी कारणीभूत ठरू लागले आहेत. यकृताला इजा झाल्यामुळे हेपटायटिस होऊ शकतो किंवा कर्करोग होण्याचीही शक्यता असते.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार (डब्ल्यूएचओ) भारतात ४० दशलक्ष व्यक्तींना हेपटायटिस बी या विकाराची लागण झालेली आहे आणि ६ ते १२ दशलक्ष व्यक्तींना गंभीर स्वरुपाचा हेपटायटिस सी झालेला आहे. गंभीर स्वरुपाचा हेपटायटिस असलेल्या व्यक्तींपैकी केवळ ५% व्यक्तींनाच या विकाराचा संसर्ग झाल्याची जाणीव आहे. यापैकी केवळ १% व्यक्तींना यावरील उपचार उपलब्ध आहेत. हेपटायटस ई हा विषाणू संसर्गजन्य हेपटायटिससाठी कारणीभूत आहे. मुलांमध्ये बहुधा हेपटायटिस ए हा विषाणू आढळतो. यकृत निकामी होण्यासाठी बहुधा हेपटायटिस ई हा विषाणू कारणीभूत ठरतो.

मुंबईतील रिजनरेटिव्ह मेडिसीन रिसर्चर डॉ. प्रदीप महाजन म्हणतात, यकृताचा बहुतेक भाग हा यकृताच्या पेशींपासून तयार झालेला असतो. त्याला हेपॅटोसाइट्स म्हणतात. या पेशींचे सरासरी आयुर्मान १५० दिवसांचे असते. याचा अर्थ हा की यकृत नियमितपणे स्वत:ची पुनर्निर्मिती करत असते. हा एकमेव अवयव असता आहे ज्याची पुनर्निर्मिती होऊ शकते. यकृताच्या कर्करोगाचे प्रमाणही वाढू लागले आहे. यात कर्करोग पसरून यकृतापर्यंत पोहोचण्याऐवजी त्याची सुरुवातच यकृतापासून होऊ लागली आहे. याचा संबंध हेपटायटिस सी या विषाणूच्या संसगार्शी आहे.

या विषाणूमुळे यकृताचा दाह होतो. हेपटायटिस सी या विषाणूची वाढ हळुहळू होत असल्याने, ज्यांना आता कर्करोग झाला आहे त्यांना हेपटायटिस विषाणूचा संसर्ग २०, ३० किंवा ४० वर्षांपूर्वी झालेला असतो.
थोडे नवीन जरा जुने