'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड १९' साठी वनविभागाकडून एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय - वनमंत्री संजय राठोड यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आर्थिक मदतीसाठी केलेल्या आवाहनाला वनविभागातील सुमारे पंचवीस हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रतिसाद देऊन आपले एक दिवसाचे वेतन (सुमारे अडीच कोटी रुपये) देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. प्रधान सचिव वने तसेच वनरक्षक, वनपाल यांच्यापासून ते प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्यापर्यंतचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचा त्यात समावेश आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसाठी आर्थिक अडचण येऊ नये म्हणून ही रक्कम देण्यात येणार असल्याचे वनमंत्री श्री. राठोड यांनी सांगितले.

वनमंत्री श्री.राठोड यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे.
थोडे नवीन जरा जुने