मधुमेहाचे लवकर निदान महत्त्वाचे
मधुमेह हा लक्षणे दिसत नसलेला विकार आहे. बहुतेक वेळा रुग्णांना काहीच लक्षणे दिसत नाहीत. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर मधुमेहाची कोणतीही सामान्य लक्षणे नाहीत. त्यामुळे लोकांनी लक्षणे दिसेपर्यंत थांबू नये, तर ज्यांना मधुमेह होण्याची शक्यता जास्त आहे त्यांनी वेळीच तपासणी करून घ्यावी. तुम्ही चाचणी करून घेतली तर लवकर निदान होईल. वेळीच निदान झाले तर तुम्ही ते सूक्ष्म जंतू गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण करण्याआधीच त्यावर उपचार करता येतील. आजच्या मधुमेहीदिनानिमित्त मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी, याची सविस्तर माहिती.

दरवर्षी अनेकांना मधुमेह होतो आणि त्यामुळे त्यांच्या जीवनशैलीत खूप बदल होतात. मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर पाय बधीर होणे, दृष्टी जाणे, मज्जातंतूंना अपाय होणे आणि मृत्यू ओढावण्याचीही शक्यता असते. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मधुमेहींना दरररोज इन्सुलिनची दोन इंजक्शन घ्यावी लागतात आणि त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण रोज तपासून घ्यावे लागते. त्याचप्रमाणे अशा काही सवयी आहेत, ज्या अंगीकारल्या तर मधुमेहावर ब-यापैकी नियंत्रण मिळवता येऊ शकते.

मधुमेह जडण्याची मोठय़ा प्रमाणावर शक्यता असलेल्यांनी वेळीच चाचणी करून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. ज्यांच्या कुटुंबात मधुमेह अनुवांशिक आहे, त्यांना हा विकार जडण्याची शक्यता अधिक असते. वयाच्या तिसाव्या वर्षानंतर मधुमेह जडण्याची शक्यता वाढते. आशिया खंडात राहणाऱ्यांना हा धोका अधिक असतो. ज्यांची बैठी जीवनशैली आहे, जे स्थूल आहेत, तणावाखाली आहेत, ज्या महिलांना पॉलिसिस्टिक ओव्हरिअन सिन्ड्रोम हा विकार आहे आणि जे स्टिरॉइड्स (उत्तेजक द्रव्यांसारखी) काही औषधे घेत आहेत त्यांना मधुमेह जडण्याचा धोका अधिक असतो. वर नमूद केलेल्या गटात बसणा-या प्रत्येक व्यक्तीने चाचणी करून घेणे अत्यावश्यक आहे.

रुग्णाची चाचणी कशी करावी?

उपाशीपोटी रक्तशर्करेची चाचणी करावी, जेवल्यानंतर दोन तासांनी चाचणी करावी, अनियत रक्तशर्करेची चाचणी, हिमोग्लोबिन अ-१ चाचणी आणि ओरल ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट (तोंडी ग्लुकोज सहनक्षमता चाचणी) करावी. तोंडी ग्लुकोज सहनक्षमता चाचणी करणे अत्यंत सोपे असते आणि ती अनेकदा करतात. रुग्णाला १०० ग्रॅम ग्लुकोज देऊन ही चाचणी करण्यात येते.

गर्भधारणा केलेल्या महिलांची ओरल ग्लुकोज चाचणी थोडी वेगळ्या पद्धतीने करण्यात येते. त्यांना केवळ ७५ ग्रॅम ग्लुकोज देण्यात येते. त्यामुळे कोणती चाचणी करावी, हे लोकांना कळू शकेल.

लोकांना उपचारांविषयी खूप काळजी वाटत असते. पण हे उपचार आहार, व्यायाम, जीवनशैलीतील सुधारणा, मानसिक तणाव कमी करणे, योगासने इत्यादींपासून सुरू होतात. नसर्गिक पद्धतीने शर्करेचे प्रमाण कमी करण्यासाठी हे उपचार करून पाहावेत. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी साखर, गूळ आणि मैद्यासारखे पदार्थ टाळावेत. मीठ आणि तेलाचे प्रमाणही कमी करावे. त्यांनी साखरेऐवजी सुक्रालोजसारखा पर्याय निवडावा.

मधुमेहाचा धोका कमी करण्याच्या आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासाठीच्या काही टिप्स खालीलप्रमाणे :

वजनावर नियंत्रण ठेवा. शरीरात चरबी अधिक असेल, विशेषत: पोटाच्या भागात चरबी साठून राहिली असेल तर इन्सुलिन तयार करण्यास शरीराकडून होणारा प्रतिकार वाढू शकतो. यामुळे टाइप-२ मधुमेह होण्याची शक्यता असते.

नियमित व्यायाम करा. दररोज किमान ३० मिनिटे व्यायाम करा. दररोज साधारण प्रकारची शारीरिक हालचाल केल्यास वजन नियंत्रणात राहते, रक्तशर्करेचे प्रमाण कमी होते आणि रक्तदाब आणि कोलेस्टरॉलमध्येही सुधारणा होते.

समतोल, सकस आहार घ्यावा. तुमच्या आहारातील चरबीयुक्त पदार्थ कमी करावेत, विशेषत: सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट्स टाळावेत. फळं, भाज्या आणि तंतुमय पदार्थ असलेला आहार घ्यावा. आहारातील मीठ कमी करावे. प्रक्रिया केलेल्या पदार्थामध्ये मीठ, चरबी आणि किलोज्युल अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे ताजे घटक वापरून घरी तयार केलेले पदार्थ खाण्यावर भर असावा.

मद्यपान मर्यादित करावे आणि धूम्रपान सोडून द्यावे. प्रमाणापेक्षा अधिक मद्यपान केल्याने वजन वाढते आणि तुमचा रक्तदाब आणि ट्रायग्लिसराइडची पातळी वाढते. पुरुषांनी दिवसाला केवळ दोन प्रमाणित िड्रक्सपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये आणि महिलांनी एका प्रमाणित िड्रकपेक्षा अधिक मद्यसेवन करू नये.

रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम, समतोल आहार आणि संतुलित वजन ठेवून बहुतेक जण हे साध्य करू शकतात. काही जणांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यावी लागू शकतात.

नियमित तपासणीसाठी डॉक्टरांची भेट घ्या. तुमचे वय जसजसे वाढते तसतसं तुमच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण, रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टरॉलच्या पातळीची तपासणी करणे हितावह आहे.

आहार निरोगी शरीरासाठी

घरातील पती-पत्नी दोघेही नोकरी करत असतील तर स्वयंपाक करताना थकवा येत असल्यामुळे तयार आणि रेडी-टू-ईट पदार्थावर अधिक भर देण्यात येतो. एकल किंवा विवाहित, जे बाहेरील पदार्थावर अवलंबून आहेत, त्यांना आरोग्याच्या तक्रारी जास्त प्रमाणात भेडसावू शकतात.

तुम्हाला ट्रान्सफॅटबद्दल माहिती आहे का? तुम्ही सेवन करत असलेल्या बहुतेक पदार्थामध्ये ट्रान्सफॅट असतात, जे आरोग्यासाठी अपायकारक असतात. ट्रान्सफॅटमुळे हृदयविकार आणि मधुमेह जडण्याचे प्रमाण वाढते असे संशोधनाअंती आढळून आले आहे. ट्रान्सफॅट हे हायड्रोजनित फॅट्स (चरबी) असतात.

चरबीच्या पेशी या कार्बन आणि हायड्रोजनच्या साखळीने दुहेरी बंधांतून गुंफले गेलेले असतात. हायड्रोजनित चरबीमध्ये तळलेले पदार्थ अधिक काळ टिकतात, ते अधिक कुरकुरीत होतात आणि तुपाच्या तुलनेने स्वस्त असतात. त्यामुळे डालडा पिढी म्हणून ओळखल्या जाणा-या पिढीचे यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. घरात, खानपानसेवा केंद्रांमध्ये आणि बेकरीमध्ये त्याचा मुबलक प्रमाणात वापर करतात.

वेफर, कुकीज, बिस्किटे, केक, पिझ्झा, मेवामिठाई, नमकीन आणि इतर चमचमीत पदार्थामध्ये ट्रान्सफॅट असतात. व्यावसायिक पातळीवर तयार करण्यात येणा-या बहुतेक पदार्थामध्ये ट्रान्सफॅट कमी-अधिक प्रमाणात असतात. हायड्रोजनित वनस्पती तेल, प्रक्रिया केलेले अन्न, प्रि-मिक्स्ड पदार्थ, प्रि-मिक्स्ड चिकन, गोठवलेले पदार्थ, मायक्रोवेव्ह पदार्थ, पाव आणि रेडी-टू-ईट (तयार पदार्थ) यामध्ये ट्रान्स फॅट असतात.

संशोधनात असे आढळून आले आहे की, भारतीयांच्या शरीरात साचणारे ८०% ट्रान्स फॅट रस्त्यावरील खाद्यपदार्थामधून जमा झालेले असतात. म्हणजेच चाट, सामोसे, जिलबी, भजी विकणारे खाद्यपदार्थ विक्रेते ट्रान्सफॅट खाऊ घालत असतात. पदार्थ तळण्यासाठी ते वनस्पती तेलांचा वापर करतात. तंदुरी रोटी आणि नानसाठीसुद्धा वनस्पती तेलच वापरतात.

त्यामुळे तुम्ही पदार्थासाठी शॉर्ट कट वापरता किंवा तुमच्या मुलांच्या फास्ट फूडच्या मागण्या पूर्ण करता तेव्हा तुम्ही तुमच्या मुलांसाठी धोका ओढवून घेत आहात, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आठव्या नवव्या वर्षी कोलेस्टरॉल, मधुमेह आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे वाढलेले प्रमाण हे अत्यंत चिंताजनक आहे. पालक म्हणून आपल्यासाठीही ही चिंतेचीच बाब आहे!

निरोगी सवयी अंगीकारा

योग्य प्रश्न विचारा :

रेस्टॉरंटमध्ये किंवा कोणत्याही खाद्यपदार्थाच्या दुकानात जाऊन ते कोणते तेल वापरतात हे विचारण्यास कचरू नका. वनस्पती तेल हे उत्तर असेल तर ते तुम्हाला अनुकूल नाही – ते हायड्रोजनित असू शकते! रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर तळलेले पदार्थ टाळा, त्याऐवजी उकडलेल्या पदार्थावर भर द्या.

लेबल काळजीपूर्वक वाचा :

एका अभ्यासानुसार केवळ ४६% ग्राहकांना लेबलवरील मजकूर समजतो, तोही थोडासा. त्या लेबलवरील घटकांचे तुम्ही विेषण कराल, याची खातरजमा करा. हायड्रोजनेटेड किंवा पार्टली-हायड्रोजनेटेड हे शब्द असतील तर तुम्ही सतर्क व्हा! लाईट किंवा रिडय़ुस्ड फॅट असे शब्द असलेले पदार्थसुद्धा ट्रान्सफॅटविरहित असतीलच असे नाही.

उत्पादक काही वेळा चरबीयुक्त घटक कमी करतात पण हायड्रोजनित चरबीचे प्रमाण तसेच असते. तुम्हाला खात्री नसेल तर असे पदार्थ टाळा.

प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे कमी प्रमाणात सेवन करा : पॅकवर नमूद केलेले प्रमाण हे एका नगासाठीचे असते. समजा, एका बिस्किटाच्या ब्रँडवर १.८ ग्रॅम प्रति नग असे प्रमाण असेल आणि तुम्ही तीन नग खाल्ले तर तर तुम्ही ५.४ ग्रॅम ट्रान्सफॅटचे सेवन करता! अनेक लेबलांवर हायड्रोजेनेटेड व्हेजिटेबल ऑईल असे लिहिलेले असते, पण त्याचे प्रमाण लिहिलेले नसते. हे पदार्थ टाळावेत.

घरचे पदार्थ खा :

तुमच्याकडून चूक होणार नाही. तुमच्या कुटुंबात हृदयविकार झालेल्या व्यक्ती असतील तर तळलेले किंवा भरपूर तेलात तळलेले पदार्थ टाळा. स्वयंपाकासाठी रिफाईन्ड वनस्पती तेल वापरा. तुम्ही एखाद्या अधिक चांगल्या तेलात खोब-याचे किंवा राईचे तेल घालून ते स्वयंपाकासाठी वापरा. त्यामुळे तुम्ही आरोग्याला अपाय न करता पदार्थाला चांगली चव मिळू शकेल.

आरोग्यवर्धक चवी विकसित करा :

परतलेल्या भाज्यांपेक्षा आमटीशी सलगी करा. आमटी करताना तेलाऐवजी टोमॅटोचा गर किंवा चरबीविरहीत दही वापरा. हळूहळू तुमच्या आहारातून तेल काढून टाका. तुम्ही तळलेले पदार्थ खात असाल तर कमी तेलात तळण्यास सुरुवात करा, मग परतवण्यास सुरुवात करा, त्यानंतर बािस्टग आणि मग भाजून खा. हे एवढे कठीण नाही. प्रमाणित केलेली सेंद्रिय उत्पादने वापरा. सेंद्रिय नियमावलीनुसार हायड्रोनेजेशनची प्रक्रिया तिथे टाळली जाते.

आरोग्यकारक जीवनशैलीचा अंगीकार करा :

दररोज किमान ४०० ते ५०० ग्रॅम तंतुयुक्त ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन करा. पाचक तंतूंमुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो. विरघळणारे तंतू पाण्यात जेल तयार करतात आणि आंतडय़ांमधील मार्गात आम्ल आणि कोलेस्टरोल यांना बांधून ठेवतात आणि ते शरीरात पुन्हा शोषले जात नाहीत. शेंगदाणेसुद्धा आरोग्यकारक असतात, ते भूक भागवतात, लिपिड पातळीसाठी लाभदायक असतात आणि हृदयाचे ठोके धडधडत ठेवतात. तुम्ही घेत असलेल्या तेलाचे सेवन आणि ट्रान्सफॅटचे सेवन याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

स्थूलपणा

ट्रान्सफॅट ट्रायग्लिसराईड्समध्ये परिवर्तीत होतात आणि ते शरीरातील मेदयुक्त तुतीमध्ये साचतात. त्यामुळे ती व्यक्ती स्थूल होते.

मधुमेह

भारतात ट्रान्सफॅटच्या सेवनाचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे होणारा टाईप-२ मधुमेह याबाबत आरोग्यसेवा क्षेत्रातील व्यावसायिकांमध्ये चिंता वाढीस लागली आहे. अमेरिकेतील हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थने केलेल्या अभ्यासानुसार ट्रान्सफॅट रक्तातील शर्करेच्या चयापचय क्रियेत हस्तक्षेप करतात.

त्याचप्रमाणे ट्रान्सफॅटमुळे महिलांना वंध्यत्व येऊ शकते, कर्करोग, यकृत व मेंदूच्या कार्यामध्ये अडथळा येणे इत्यादी आरोग्यविषयक समस्याही उद्भवू शकतात, असे अभ्यासाअंती आढळून आले आहे. ट्रान्सफॅटचा मेंदूूतील न्यूरोपेप्टाइड्स या प्रथिनांवरही परिणाम होतो. त्यामुळे वयाची ६५ वष्रे पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या आकलनक्षमतेवर परिणाम होतो.

ट्रान्सफॅटमुळे तुमच्या आरोग्याला काय अपाय होतो?

रक्तवाहिन्यांचा हृदयविकार ट्रान्सफॅटमुळे आरोग्यास हितकारक असलेल्या एचडीएल कोलेस्टरॉलऐवजी अपायकारक ठरणा-या एलडीएल कोलेस्टरॉलचे प्रमाण शरीरात वाढते, हे अभ्यासाअंती आढळून आले आहे. ट्रान्सफॅट सेवन २ टक्क्यांनी वाढले तर रक्तवाहिन्यांचा हृदयविकार होण्याची शक्यता दुपटीने वाढते.

याविरुद्ध सॅच्युरेटेड फॅटचे सेवन १५ टक्क्यांनी वाढले तर हा धोका उद्भवू शकतो. ट्रान्सफॅटमुळे शरीराचे आकारमान वाढण्यास चेतवले जाते. ते हृदयातील पेशींभोवती चिकटते. त्यामुळे हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येते.
थोडे नवीन जरा जुने