भगवान महावीर जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा

मुंबई, दि. 6 : 'जगा व जगू द्या' असा शांतीचा संदेश देणाऱ्या तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, भगवान महावीर यांनी जगाला संयम आणि अहिंसेचा मार्ग दाखविला. 'जगा आणि जगू द्या' हा त्यांचा संदेश आजच्या घडीला अत्यंत समर्पक आहे. 

प्रत्येक प्राणीमात्राला जगण्याचा अधिकार आहे ही जैन धर्मातील शिकवण मानवतेसाठी महत्त्वपूर्ण अशीच आहे. त्यामुळे प्रत्येकाने परस्परांच्या जीवन अनुसरणाचा आदर करायलाच हवा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने