वेळेत निदान कोडापासून बचाव
कोड हा असा आजार आहे ज्याला सोपा इलाज नाही. परंतु आरंभीच्या अवस्थेमध्ये निदान आणि उपचार झाल्यास हा रोग कमी करता येऊ शकतो आणि तो पसरण्यावर नियंत्रण आणता येतं. हा रोग संसर्गजन्य नाही आणि प्राणघातकही नाही.

मानवाच्या त्वचेतील मेलॅनिन पेशी किंवा रंग निर्माण करणा-या पेशी योग्य प्रकारे कार्यरत नसतात तेव्हा कोड नावाचा रोग होतो. आरंभीच्या अवस्थेमध्ये फिक्कट रंगाचे ते दुधी-पांढ-या रंगाचे भाग दिसू लागतात, जे हळूहळू आकाराने वाढत जातात किंवा शरीराच्या दुस-या भागात दिसू लागतात. त्यामुळे शरीराच्या त्वचेवर परिणाम होतो. तसाच परिणाम टाळू, ओठ आणि जननेंद्रियांवर दिसून येऊ शकतो.

इतर अनेक त्वचारोगांप्रमाणेच कोडाशी संबंधित प्राथमिक आव्हान मानसिक आहे. सर्वदूर पसरलेले गरसमज, क्षयरोगाबरोबर त्याची गल्लत, मर्यादित समज आणि लोकांच्या संवेदनाशून्य शंका यामुळे रोग्याला समाजात वावरताना फार त्रासदायक होते. कोडाने ग्रस्त असलेले भारतीय सामान्यपणे कमी आत्मविश्वास, काळजी, शरम, राग आणि कधी कधी गंभीर निराशेचे बळी ठरलेले आढळून येतात. पुरुष, स्त्रिया आणि मुले यांना सारख्याच प्रमाणात होणारा हा रोग अंदाजे २% भारतीय लोकसंख्येमध्ये आढळतो.

ब-याचशा लोकांत वयाच्या चाळीसाव्या वर्षापूर्वी त्वचारोग (कोड) होतो. साधारण निम्म्या लोकांत तो वयाच्या २० वर्षापूर्वीच होतो. त्वचारंजकपेशींचं कार्य परिणामकारकपणे का होत नाही हे काही ठरावीक नाही. तरीही, त्यात काही घटक असतात जे बहुधा जबाबदार असू शकतात. त्यातील काहींमध्ये अनुवंशिकशास्त्र, सदोष रोगप्रतिकार प्रणाली जी स्वत:च्या पेशींवरच हल्ला करते (स्वयं-प्रतिकार) आणि वाढलेले फ्री रॅडिकल-इंडय़ूस्ड डॅमेज (ऑक्सिडीकर तणाव) यांचा समावेश होतो.

त्वचेला झालेली जखम आणि सूर्यप्रकाशाने होणारा त्वचेचा तीव्र क्षोभ हे इतर काही घटक आहेत ज्यामुळे शरीरावर कोडाचे डाग उठू शकतात. ४०% प्रकरणांत, अनुवंशिकतेमुळे त्वचारोग दिसून येत असला तरी, अशीदेखील प्रकरणे आहेत ज्यांच्यामध्ये त्वचारोगाचा कोणताही कौटुंबिक इतिहास नसणा-या रुग्णांना पहिल्यांदाच त्वचारोग झालेला आढळून आलेला आहे.

कोड हा असा आजार आहे ज्याला सोपा इलाज नाही. परंतु आरंभीच्या अवस्थेमध्ये निदान आणि उपचार झाल्यास ५०% हून जास्त उदाहरणांमध्ये औषधं आणि फोटो उपचारपद्धतीद्वारे (लाईट उपचारपद्धती) रोग कमी करता येऊ शकतो आणि तो पसरण्यावर नियंत्रण आणता येऊ शकते.

सध्या अनेक पद्धती उपलब्ध आहेत, ज्यांचा वापर करून कोडाचा गंभीररित्या परिणाम झालेल्या त्वचेवर सुधारणा होण्यासाठी मदत होऊ शकते. यामध्ये तात्कालिक आणि तोंडाने घेण्याची औषधे, सौंदर्यप्रसाधने, लाईटपद्धती वापरून परत पिगमेंटेशन, परिणाम न झालेल्या त्वचेच्या भागाचे पिगमेंटेशन कमी करणे आणि त्वचा रोपण यांचा समावेश होतो.

इतर अनेक त्वचारोगांप्रमाणेच कोडाशी संबंधित आव्हान रोगाचा मानसिक आघात हे आहे. बहुतेक वेळा या रोगाने ग्रस्त लोकांना अनेकदा समाजात सामावून घेतले जात नाही. लग्नासाठी अयोग्य ठरवले जाते आणि अनावश्यक लक्ष्याचे केंद्र ठरतात. याचा माणसावर गंभीर मानसिक आघात होतो. त्याच्या त्वचेच्या स्वरूपामुळे तो निराश होतो.

जागतिक कोड दिनाच्या दिवशी या त्वचारोगासंबंधीचे सर्वसामान्य गरसमज दूर करण्याची तातडीची गरज आहे. हा रोग संसर्गजन्य नाही आणि प्राणघातकही नाही. हा क्षयरोग नाही, जे अनेकदा मानले जाते आणि त्याचा व्यक्तीच्या शारीरिक अंगभूत गुण आणि मानसिक क्षमता यावर कोणताही परिणाम होत नाही. कोडाशी संबंधित सामाजिक कलंक दूर झाला तर हा रोग झालेल्या व्यक्ती सामान्य माणसाप्रमाणेच सर्वसाधारण आणि पूर्णपणे कार्यक्षम आयुष्य व्यतित करू शकतात.
थोडे नवीन जरा जुने