फ्रॅक्चर झालाय ? हाडे बळकट करण्यासाठी हे कराआकस्मिकपणे शरीराच्या एखाद्या भागात फ्रॅक्चर झाल्याने जीवनशैलीमध्ये अडथळा निर्माण होतो. अशा स्थितीत खाण्या-पिण्यामध्ये बदल करून हाडे बळकट केले जाऊ शकतात.
जोपर्यंत प्लास्टर निघत नाही तोपर्यंत नियमितपणे अननसाचे सेवन करावे. अननसात असलेल्या ब्रोमेलन एंझाइममुळे फ्रॅक्चर झालेल्या हाडाची सूज कमी होण्यास आणि हाडे बळकट होण्यास मदत मिळते. तसेच अशा स्थितीत डॉक्टर ब्रोमेलन सप्लिमेंट घेण्याचा सल्लाही देतात.


प्रिझव्र्हेटिव्ह खाद्यपदार्थांचे सेवन करू नये. यामध्ये मोठय़ा प्रमाणात असलेल्या फॉस्फरसमुळे हाडे अशक्त बनतात.


अशा स्थितीत जास्त चालणे-फिरणे किंवा काम करणे टाळावे. जेणेकरून इतर समस्या किंवा दुखापतीचा धोका कमी करता येईल.


जेवणात भरपूर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचा समावेश करावा. कारण यामुळे हाडांची झालेली झीज भरून निघते आणि स्नायू बळकट होतात.

सोडायुक्त आणि कॅफिनयुक्त पेय पदार्थांचे सेवन करू नये, कारण यामुळे रिकव्हरी होण्यास वेळ लागतो.


वजनदार सामान उचलू नये. यामुळे फ्रॅक्चर बोनवर अनावश्यक भार पडतो आणि पीडिताची समस्या आणखी वाढू शकते.
थोडे नवीन जरा जुने