प्रोस्टेट कॅन्सरशी लढताना...दरवर्षी २००,०००हून जास्त लोकांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे निदान होते आणि अंदाजे हजारो लोक मृत्युमुखी पडतात. त्वचेच्या कॅन्सर नंतर प्रोस्टेट कॅन्सर हा पुरुषांमध्ये सर्रास होणारा कॅन्सर आहे. सरासरी सातपैकी एका पुरुषाला त्यांच्या आयुष्यात प्रोस्टेट कॅन्सर होतो.

हा पुरुषांमध्ये आढळणा-या कॅन्सरपैकी प्रोस्टेट कॅन्सर हा एक मुख्य कॅन्सर आहे आणि मृत्युलाही तेवढाच कारणीभूत आहे. प्रोस्टेट कॅन्सरच्या गाठी अतिशय प्राणघातक असतात आणि जर लवकर निदान झाले तर त्या ब-या होऊ शकतात. जर हा कॅन्सर पसरला तर रुग्णाला हाडांमध्ये वेदना जाणवू शकते, त्याचे वजन घटते आणि किडनी निकामी होते. प्रोस्टेट कॅन्सरचा उपचार क्युरेटिव्ह (शस्त्रक्रिया किंवा रेडिएशन थेरपी) किंवा पॅलिटिव्ह (हार्मोन औषधे) असतो. याची लक्षणे केवळ आजाराच्या उशीराच्या टप्प्यावर दिसू लागतात, त्यामुळे वार्षिक रक्त तपासणी करणे प्रोस्टेट कॅन्सर शोधण्यासाठी आवश्यक असते.

प्रोस्टेट कॅन्सरचे निदान कोणत्याही पुरुषासाठी नक्कीच दु:खप्रद असते. परंतू, प्रोस्टेट कॅन्सर लवकर निदान झाल्यास बरा होऊ शकतो आणि म्हणूनच लवकर निदान होणे महत्वाचे असते.

कोणत्याही आजाराचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार करण्यासाठी अनेक विकल्पांचा अवाका शिल्लक राहतो. केवळ पीएसएची एक रक्ततपासणी आणि डिजीटल रेक्टल एक्झाम प्रोस्टेट कॅन्सरच्या शंकेच्या तपासणीसाठी पुरेसे असते.

जर कॅन्सर फक्त प्रोस्टेट ग्रंथीच्याआतच आहे असे निदान नक्की झाले तर किहोल सर्जरीने संपूर्णपणे बराहोऊ शकतो. ही शस्त्रक्रिया आत्ताच्या दिवसांमध्ये लेप्रोस्कोपी किंवा रोबोटिक्सने केली जाते. दोन्ही प्रकारच्या शस्त्रक्रियांचे परिणाम एकसारखे असतात आणि त्या जुन्या टाक्यांच्या शस्त्रक्रियेपेक्षा जास्त परिणामकारक आहेत.

सध्या कॅन्सरचा प्रसार जर फक्त प्रोस्टेट ग्रंथी मध्ये असेल तर, याला किमान इन-व्हॅसिव्ह शस्त्रक्रियांमार्फत उपचार करण्याची आणि रुग्णाच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याची संधी असू शकते.

जरी कॅन्सरचा फैलाव जास्त झाला असेल तर नवीन औषधांनी हा फैलाव नियंत्रीत करणेआणिरुग्णास जास्तीत जास्त जीवनकाल देणे सोपे होते, जे इतर कॅन्सर मध्ये शक्य नाही. त्यामुळे सुयोग्य युरॉलॉजिस्टद्वारे योग्य उपचार करणे अतिशय महत्वाचे असते.

प्रोस्टेट कॅन्सर पूर्णपणे नव्हे पण काही प्रमाणातअनुवांशिक आजार आहे. यामुळे प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णाचे नातेवाईक इतरांपेक्षा जास्त जोखमीवर असतात. कोणत्याही आजाराला प्रतिकार करण्याची सर्वोत्तम पध्दत म्हणजे नियमित आरोग्य चिकित्सा करुन घेणे, तुमच्या आजाराला समजून घेणे आणि लढ्याच्या पत्येक पातळीवर मार्गदर्शन घेणे होय. ताजी फळे, टोमॅटो आणि हिरव्या पालेभाज्यांचा आहार प्रोस्टेट कॅन्सर विरुद्ध लढा देण्यासाठी फायदेशीर ठरतात.
थोडे नवीन जरा जुने