हाय हिल्स व गुडघा संधिवात

महिला एक चूक करतातच, ती म्हणजे त्यांच्या पायासाठी योग्य आकाराच्या शूजची निवड करत नाहीत. वषार्नंतर तुमच्या पायाचा आकार समानच असतो का, शूज खरेदी करताना तुम्ही पायाचा आकार मोजता का, लांबी-रुंदी यांचे मापन करता का. अनेक लोकांना वाटते की याकडे अधिक लक्ष दिले नाही, तरी चालेल, पण हीच मोठी चूक आहे.


महिलांना हील्स परिधान करण्याठकरिता दबाव टाकणा-या धोरणांना जगभरातून आव्हान केले जात आहे. २००१ मध्ये, लास वेगासमधील कॉकटेल वेट्रेसेसने किस माय फूट कॅम्पेनचे आयोजन केले, जी कसिनोमधील हाय हिल्स परिधान करण्याच्या आवश्यकतांना दूर करण्यामध्ये यशस्वी ठरली. २०१४ मध्ये, काल्गरी, अल्बर्टा, कॅनडा येथील तीन रेस्टॉरण्ट चेन्समधील वेट्रेसेसने दावा केला की वेदना व दुखापतींबाबत तक्रार केली असताना देखील, त्यांना कामाच्या ठिकाणी हाय हिल्स परिधान करावे लागत होते. एअरलाइनच्या कर्मचारी युनियनने व्यक्त केले की हाय हिल्स परिधान करण्याच्या आवश्यकतेमुळे हवाई सुंदरींचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात येऊ शकते आणि त्यांनी सदस्यांना हा नियम दूर करण्याची विनंती केली. २०१६ मध्ये युके येथे अशाच धोरणांची चाचणी घेण्यात आली, जेथे हंगामी रिसेप्शनिस्ट, निकोला थॉर्पला पगार न देता कामावरून काढण्यात आले होते, कारण तिने प्राईस वॉटर हाऊस कूपर्सच्या अकाऊंटण्ट्स कार्यालयामध्ये ड्रेस कोडचे पालन करण्यास नकार दिला होता.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे सांगतात की सर्व महिला कर्मचारी त्यांच्या पसंतीनुसार फ्लॅट शूट किंवा प्लेन कोर्ट शूज परिधान करु शकतात. एप्रिल २०१७ मध्ये, ब्रिटीश कोलुम्बियाच्या कॅनेडियन प्रांताने नियोक्तांच्या कामाच्या ठिकाणी महिलांना हाय हिल्स परिधान करण्याच्या आवश्यकतेला प्रतिबंध करण्याकरिता कार्यस्थल कायद्यामध्ये बदल केला.

केस स्टडी १ –

२९ वर्षीय सनायाचे उदाहरण पहा, जिच्या गेल्या ४ महिन्यांपासून गूडघ्यामध्ये वेदना होत होत्या. दिवस संपताना वेदना वाढत जायचा आणि रात्रीच्या वेळी आराम केल्याने सकाळी बरे वाटायचे. गुडघ्याचे एक्स-रे व वैद्यकीय चाचणीमधून संधिवाताची कोणतीच लक्षणे दिसून आली नाहीत. अधिक चौकशीतून निदर्शनास आले की कामाच्या ठिकाणी हाय हिल्स परिधान करण्यास सुरुवात केल्यानंतर गुडघ्यामध्ये वेदना होण्यास सुरुवात झाली. डॉ. कौशल मल्हान म्हणतात, मी तिला काही दिवसांसाठी हाय हिल्स परिधान न करण्याचा सल्ला दिला, ज्यामुळे लक्षणीय सुधारणा दिसून आल्या. यामधून असे दिसून आले की हाय हिल्सच्या परिधानामुळे गुडघ्यामधील सदोष बायोमेकॅनिक्स वेदनांस कारणीभूत ठरत होते आणि जर वेळेवर उपचार केले नाही, तर संधिवात होण्याचा धोका असू शकतो.

हाय हिल्समुळे गुडघा संधिवाताचा धोका वाढतो का?

जिने चढताना-उतरताना गुडघ्यामध्ये होणा-या वेदना हे गुडघा ओस्टिओथराईटिसचे सुरुवातीचे लक्षण आहे. ही स्थिती पुरुषांपेक्षा महिलांमध्ये प्रकषार्ने दिसून येते. असे मानले जाते की कमकुवत स्नायू हा प्रमुख कारणीभूत घटक आहे आणि वास्टस मेडियालिस (पुढील बाजूस असलेल्या मांडीच्या स्नायूमधील अंतरिम भाग) आणि वास्टस लॅटरालिस (पुढील बाजूस असलेल्या मांडीच्या स्नायूमधील बाह्य भाग) यांच्यामधील असंतुलन महत्त्वाचे असते. अहवाल सांगतो की आरोग्यदायी महिलांमध्ये हीलची उंची वाढल्यास हे असंतुलन सुद्धा वाढू शकते, ज्यामुळे त्या गुडघा ओस्टिओथराईटिसने पीडित होऊ शकतात आणि हाय हिल्सच्या वारंवार वापरामुळे गुडघाच्या ओस्टिओथराईटिस होऊ शकतो.

ओस्टिओथराईटिस वयानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये विविध प्रकारे दिसून येतो. वषार्नुवर्षे हिल्स वापरल्यास सांधे कमकुवत होत जातात आणि ऊतींची झीज होऊ लागते. नुकतेच आढळून आले आहे की ओस्टिओथराईटिस होण्याचे वय कमी होत आहे आणि ते तिस-या व चौथ्या दशकामध्ये दिसून येते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाने प्रकट केले की लवकरच ओस्टिओथराईटिस सुद्धा हृदयविषयक आजार, कर्करोग व एड्स सारखा गंभीर स्वरुपाचा आजार बनेल. पुढील काही वर्षांमध्ये युवा रुग्णांमधील ओस्टिओथराईटिसचे प्रमाणही लक्षवेधी समस्या असेल.

ओस्टिओथराईटिसची कारणे अनेक आहेत आणि प्रत्येक घटकाच्या योगदानाचे प्रमाण अनिश्चित आहे. ओस्टिओथराईटिसची कारणे पूर्णत: समजून आलेली नाहीत. आपल्याला माहित आहे की जीन्स, लठ्ठपणा, जीवनशैली, खाण्याच्या सवयी, दुखापत, अब्नॉर्मल जॉइण्ट लोडिंग व सदोष गुडघा बायोमेकॅनिक्स यांसारखे विविध घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. पुरावा आहे की ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागांमध्ये ओस्टिओथराईटिस अधिक प्रमाणात दिसून येतो आणि युवा लोकांमधील वाढत्या ट्रेण्डसाठी प्रमुख कारण आहे. खाण्याच्या बदलत्या सवयी, प्रदूषण व बैठेकाम करण्याची जीवनशैली ही शहरी-ग्रामीण तफावतीमधील प्रमुख कारणे असू शकतात. अधिक प्रमाणात शहरी भागामध्ये दिसून येणारे हाय हिल्सचे प्रमाण व ते किती प्रमाणात आहे, याबाबत स्पष्ट मत नाही? पण, ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात, याबाबत भरपूर पुरावे आहेत. गुडघ्यामधील ओस्टिओथराईटिसच्या लवकर निदानासह, ल्युब्रिकेटिंग जेल इंजेक्शन्स व किमान अंशत: नी रिसर्फेसिंग सर्जरीज सारखी नवीन तंत्रे टोटल नी रिप्लेसपेण्ट सर्जरी टाळण्याकरिता अधिक प्रचलित होत आहेत.

हिल्स परिधान करताना खालील बाबी लक्षात ठेवा:

फूट रोल – टेनिस, लॅक्रोस किंवा गोल्फ बॉलसारखा लहान, टणक चेंडू घ्या. संतुलनासाठी भिंतीसमोर उभे रहा. पायाखाली चेंडू ठेवा. पायाखाली चेंडू वरखाली ढकला, हे करत असताना आर्कवर लक्ष ठेवा. वजनाच्या दबावामध्ये बदल करत गतीवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक पायाने किमान एक मिनिट रोल करा.

काफ स्ट्रेच – भिंतीसमोर हात आडवे करुन उभे रहा. उजव्या पायासह पुढे जा, जमिनीवर पाय समांतर ठेवा. छातीच्या उंचीवर हात भिंतीवर टेकवा. उजवा गुडघा भिंतीच्या दिशने वाकवा, ज्यामुळे डाव्या काफमध्ये स्ट्रेच जाणवेल. दोन सेकंद थांबा आणि त्यानंतर स्ट्रेच सोडा. हा एक सेट. असे प्रति पायासोबत आठ सेट करा.

योग्य शूज परिधान करण्याची काळजी घ्या – महिला एक चूक करतातच, ती म्हणजे त्यांच्या पायासाठी योग्य आकाराच्या शूजची निवड करत नाहीत. वर्षानंतर तुमच्या पायाचा आकार समानच असतो का आणि जर तुम्ही यापूर्वी पाहिले नसेल, तर करुन पहा. शूज खरेदी करताना तुम्ही पायाचा आकार मोजता का, लांबी-रुंदी यांचे मापन करता का. अनेक लोकांना वाटते की याकडे अधिक लक्ष दिले नाही, तरी चालेल, पण हीच मोठी चूक आहे.

शूज काढल्यानंतर पाय स्ट्रेच करा – पाय व घोटाच्या पुढील बाजूंवर लक्ष केंद्रित करणारी स्ट्रेचेस करा, जसे टाचा खालील दिशने पॉइण्ट करा आणि अकिलिस टेन्डन व काल्फ मसल्ससाठी स्ट्रॅपसह टाचांवर ताण द्या. आणि त्यानंतर पाय आतून-बाहेरून सैल करा.
थोडे नवीन जरा जुने