जाणून घ्या... अंगठ्याचं रहस्य , अंगठाच सांगतोय तुमचा स्वभावज्या लोकांचा अंगठा मोठा आणि सुंदर असतो ते लोक कलात्मक स्वभावाचे असतात.

ज्यांचा अंगठा सुंदर असतो ते लोक बुद्धिमान व चतुर असतात.

ज्या लोकांचा अंगठा बारीक असतो ते आपल्या स्वभावामुळे कुटुंबात आणि समाजात मानसन्मान मिळवतात.

ज्या व्यक्तिच्या अंगठ्यावर खूप जास्त रेषा असतील, ती व्यक्ती खुप इमानदार आणि विश्वासू असते.

ज्या व्यक्तिच्या अंगठ्यावर पहिल्या भागात खूप जास्त उभ्या रेषा असतात, त्यांची इच्छाशक्ती प्रबळ आणि त्यांची बुद्धी चांगली चालते. ज्यांच्या अंगठ्याच्या पहिल्या भागात क्रॉसचे चिन्ह असतं, ते खूप खर्च करणारे असतात.

ज्या व्यक्तीच्या अंगठ्याचा मध्यभाग जर चांगला असेल, तर तर्कशक्ती चांगली असते, त्यांची बुद्धी चांगली असते, यामुळे समाजात त्यांना मानसन्मान मिळतो.

जर अंगठ्याच्या दुस-या भागावर गोल चिन्ह असेल तर ती लं खूप वाद घालणारी असते. अंगठ्याच्या दुस-या भागावर त्रिभुज असेल तर, त्या व्यक्तीला विज्ञानामध्ये आवड असते. अंगठ्याच्या दुस-या भागावर जाळीचे निशाण असेल तर ते चांगले नसते. या व्यक्तीमध्ये बरेच वाईट गुण असतात. 


ज्या लोकांचा अंगठा जास्त जाड व सुडौल असेल, तर ती व्यक्ती सामान्यांपेक्षा जास्त वादविवाद करणारी असते. अंगठा जास्त जाड आणि मजबूत असेल, ते लोक सर्वगुणसंपन्न असतात. ते कुटुंब आणि समाजात मिळूनमिसळून राहतात. 

सामान्यांपेक्षा लहान अंगठा असेल, तर त्यांची कार्यक्षमता कमी असते आणि कोणतेही काम ते हळूहळू करतात. अंगठा लवचिक असेल, तर हे लोक खूप कल्पनाशील असतात. असे लोक खूप खर्चिक असतात, यांना कोणतेही काम कलात्मकरित्या करायला आवडते. 

ज्यांचा अंगठा जाड असतो , त्यांचा स्वभाव चागला नसतो. चपटा अंगठा असणारे लोक निराशाजनक असतात.
थोडे नवीन जरा जुने