कॉम्पुटर कीबोर्डच्या F आणि J बटनाच्या खाली रेषा का असतात ? याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल


कॉम्पुटर कीबोर्डच्या F आणि J बटनाच्या खाली रेषा का असतात ? याचे उत्तर कदाचित तुम्हाला माहिती नसेल. आपण रोज तासनतास कॉम्पुटर बसून असतो परन्तु कीबोर्डवर f आणि j बटनाच्या खाली मार्क असतो यामागे कुठलाही प्रोडक्शनची चूक नाही की त्यामुळे कुठलाही हेल्थ बेनेफिट नाही आहे. त्यामागेही कारण आहे. टायपिंगच्या नियमानुसार कीबोर्डवर हा मार्क देण्यात आलाय.

स्क्रीनवर बघून टाईप करत असताना टाईपिंगच्या नियमानुसार अंगठ्च्या बाजूचे बोट f आणि j या अक्षरावर असणे गरजेचे असते. तसेच इतर बोटे कीबोर्डवरच्या इतर अक्षरांवर असणे गरजेचे असते. त्यामुळेच योग्य प्रकारे टायपिंग करता यावे यासाठी या दोन्ही अक्षरांखाली हा मार्क असतो. 

जलदतेने व बिनचूक टायपिंग करण्यासाठी f आणि j बटनाच्या खाली मार्क दिलेले आहेत. टायपिंग करतांना आपल्या हाताची बोटे कुठल्या बटनावर असावी हे आपल्याला चित्रातून दिसून येईल. 

२३ एप्रिल २००२ रोजी जून बोटीक यांनी या बद्दलचे पेटंट दाखल केले होते. आणि त्यानंतर सर्व कीबोर्ड वर f आणि j बटनाच्या खाली रेषा दिल्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने