ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन मधील काय चालू काय बंद राहणार ?


ऑरेंज झोनमधील व्यवहार : (कंटेनमेंट झोन बाहेर)

• जिल्ह्यातल्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरही बस सेवा सुरू ठेवता येणार नाही.

• केश कर्तनालय, स्पा आणि सलून बंद राहतील. काही अटींच्या अधीन राहून खालील बाबींना परवानगी देण्यात येईल…

• एक वाहनचालक व दोन प्रवाशांसह टॅक्सी व कॅब यांना परवानगी देण्यात येईल.आवश्यक ती परवानगी घेऊन जिल्ह्यातल्या जिल्ह्यात व्यक्ती आणि वाहनांना फिरण्यास परवानगी असेल. मात्र त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडून किंवा त्यांनी नेमलेल्या प्रतिनिधींकडून पासेस घेणे आवश्यक राहील.

• चारचाकी वाहनांमध्ये वाहनचालकाशिवाय केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करण्याची मुभा असेल.

ग्रीन झोन मधील व्यवहार
• ग्रीन झोन मध्ये सर्व व्यवहार सुरू राहतील. मात्र ज्या गोष्टींमुळे गर्दी होईल असे सिनेमागृह,शॉपिंग मॉल्स, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था,रेल्वे सेवा,सामाजिक, राजकीय, क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम सुरू ठेवता येणार नाहीत.

• अधिकृत पास असल्याशिवाय ग्रीन झोनमध्ये प्रवास करण्यास मनाई असेल.

• प्रवासी क्षमतेच्या पन्नास टक्के व्यक्तींना घेऊन बस सेवा सुरू ठेवण्यास परवानगी असेल. बस डेपोमधील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ही पन्नास टक्क्यांपर्यंत मर्यादित इतकीच असावी.

• बस सेवेला फक्त ग्रीनझोनच्या आतच फिरण्यास परवानगी असेल.

• राज्य सरकारने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना किंवा आदेश काढून ज्या गोष्टींना परवानगी दिली आहे. त्या विशिष्ट अटींच्या अधीन राहून सुरू ठेवता येतील.
रेड झोन (हॉटस्पॉट्स) मधील उपक्रम (कंटेनमेंट झोन) बाहेरील)


पुढील उपक्रमांना/कृतींना परवानगी दिली जाणार नाही :


• सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा.


• टॅक्सी आणि कॅब एकत्रित करणारे.


• जिल्ह्यार्तंगत व आंतरजिल्हा बस चालविणे.

• केशकर्तनालय, स्पा आणि सलून.

खालील निर्दिष्ट केलेल्या निर्बंधांसह उपक्रम/कृतींना परवानगी दिली जाईल:

• केवळ परवानगी असलेल्या कामांसाठी व्यक्ती आणि वाहनांची हालचाल. चारचाकी वाहनांमध्ये वाहन चालकाव्यतिरिक्त जास्तीत जास्त दोन प्रवासी असतील; दुचाकी वाहनांमध्ये मागच्या सिटवर व्यक्तिला बसता येणार नाही.
थोडे नवीन जरा जुने