मन मारून जगायला शिका, कारण कळप हरवलेल्या वासरासारखे आक्रोश करत असताना ही बाहेरून मुखवटा लावता आलाच पाहिजे


काही गोष्टी चव्हाट्यावर ओरडून सांगायच्या नसतात.त्या मनाच्या संदूकात कुठेतरी तळाशी बंद करुन ठेवलेलच उत्तम असत निदान दुसर्यंसाठी तरी..त्या जर उघडल्या बाहेर काढल्या तर आपण आपल मानत असलेल्या माणसांना त्रास होईल ह्याची भिती असते हो सायबा !!!

मन मारून जगायला तर शिकलच पाहिजे.मन असे कळप हरवलेल्या वासरासारखे आक्रोश करत असताना ही बाहेरून मुखवटा लावता आलाच पाहिजे.जस कर्णा ने लावल,आतुन गुरु द्रोणाचार्यन्ना आपली योग्यता कळत नाही ह्याच प्रचंड दुख असताना ही,अगदी तारुण्याच्या वयात...तारुण्य एक असा काळ की ज्या वेळी स्वताच्या सामर्थ्याबद्दल इतका विश्वास असतो की वाटत त्या धगधगत्या सुर्याचा रथ करुन त्याचा सारथी व्हाव....ह्या प्रचंड विश्वात मनसोक्त फिरावं...त्या वयात उर्जा असते हो सगळ जग जिंकायाची...देवाने सगळ काही भरभरून दिलेल हे वय. ह्या वयात आपल्याकडे असलेले सामर्थ्य,शक्ती,धैर्य,आकांक्षा हे जणु तारुण्या च्या रथाचे चार घोडेच की...

ह्या वयात सर्वात जवळची आणि प्रिय गोष्ट म्हणजे "मित्र"...म्हणायला गेल तर "तो फक्त मित्र आहे माझा !!!" पण अर्जुनाच्या रथाचा श्रीकृष्ण जसा सारथी तसे मित्र हे आयुष्याच्या रथाचे सारथी...आयुष्याच्या दुनियादारी ची असंख्य काळ सोबती म्हणजे मित्र!!!

कधी कधी वाटत दुनियादारी बंद करावी,सारे मुखवटे काढूण फेकून द्यावे आंणि आयुष्याचा महोत्सव करुन मनसोक्त भटकत बसाव ह्या दोस्तासोबत.ज्या लोक्कामधे ,ज्या गोष्टीमधे स्वताला आनंद वाटतो त्या कराव्यात...

नीरंतर आपुलकीचा भार वाहत,सताड जळण्यात कसला आलाय शहाणपणा???

पायातल्या जबाबदारीच्या करकचून बांधलेल्या बेड्या अशा एका झटक्यात तोडव्यात आणि निघुन जाव आपल्याच विश्वात.....

एखाद्या काटेरी कुंपणात अडकून रोज थोड थोडं रक्त निघण्यापेक्षा स्वैरपणे सफर करुन रक्तबंबाळ झालेल बर की....

उघडावे मनाच्या तळागाळातील सगळे संदुक बोलून टाकाव धडाधड सार नको असनार रडगाण ...मग होईल ते परिणाम भोगायला तयार असेल मी ...निर्भीड आणि ठाम अगदी कर्णासारख...!!!

सूतपूत्र असुनही सगळ्या हस्थिनापुरात श्रेष्ट योध्यचा मान मिळवला तो कर्णाने च !!! पण अर्जुना इतकी कौतूकाची फुले त्याच्या वाट्याला कधी आली नाहित..नवलच की हो !!!!

जे पितामाह भीष्मांना दिसले ते गुरुवर्य द्रोणचर्याना नाही...असो सगळ्यांची दृष्टी थोडीच ना भीष्मांसारखी असते अस म्हणून आपणच आपल समाधान मानायच....

शब्दांकन
-सायली कांचन
थोडे नवीन जरा जुने