पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

सातारा : थोर समाजसुधारक, प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण आदी सुधारणांचे पुरस्कर्ते छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाहू चौक कराड येथे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे,  पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कराड शहर अध्यक्ष नंदकुमार बटाने, गंगाधर जाधव नगरसेवक किरण पाटील, मोहनराव पाटील, बापू करपे, आप्पा कळके आदी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी सर्व धर्मियांना समान न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे या उद्देशाने राधानगरी धरणाची निर्मिती त्यांनी केली. त्यावेळी उद्भवलेल्या आपत्तीजनक परिस्थितीमध्येसुद्धा लोकांना दिलासा देण्याचे काम त्यांनी केले. अशा थोर महात्म्यांना त्यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या वतीने विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहिली.
थोडे नवीन जरा जुने