निवासी आयुक्त, समीर सहाय सेवानिवृत्त, श्यामलाल गोयल यांनी स्वीकारला पदभार

नवी दिल्ली, जून ३० : महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त तसेच भारतीय वन सेवाचे ज्येष्ठ अधिकारी, समीर सहाय आज सेवानिवृत्त झाले असून, त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.


महाराष्ट्र शासनासोबतच, केंद्र शासनातील मंत्रालयात सलग 33 वर्ष निरंतर सेवा देत, श्री. सहाय उल्लेखनीय कामगिरी बजावली. नवीन नियुक्त निवासी आयुक्त, श्यामलाल गोयल यांनी त्यांच्या सेवानिवृत्ती निमित्त पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. कोविड- 19 च्या महामारीमुळे सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात, अधिकारी-कर्मचाऱ्यांना जास्त संख्येत न उपस्थित राहण्याबाबतचे ओदश होते. यावेळी, नवीन नियुक्त अपर निवासी आयुक्त तसेच भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी, संतोष रस्तोगी, सहायक निवासी आयुक्त अजीतसिंह नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी, अमरज्योत कौर अरोरा व अन्य अधिकारी- कर्मचारीगण उपस्थित होते.
भारतीय वन सेवेच्या 1987 तुकडीचे अधिकारी, समीर सहाय यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषवत उत्तम कामगिरी बजावली. श्री सहाय, हे मूळचे उत्तरप्रदेश मधील लखनऊ येथील आहेत. महाराष्ट्र शासनासह त्यांनी केंद्र शासनाच्या मंत्रालयात प्रतिनियुक्तीवर असताना प्रशंसनीय कार्य केले आहे.
चंद्रपूर येथे वनसंरक्षक विभागात, उप वनसंरक्षक म्हणून त्यांची सर्वप्रथम नियुक्ती झाली. गडचिरोली व औरंगाबाद जिल्ह्यांमध्ये, त्यांनी उप वन संरक्षक पदावर कार्य केले. औरंगाबाद येथील कामगिरी बजावताना, वन विभागात पसरलेल्या भ्रष्टाचारावर आवर घालत, त्यांनी प्रशंसनीय कार्य केले. तद्नंतर, वन्यजीव व कार्य आयोजन विभाग, औरंगाबाद येथेही उत्तम कामगिरी बजावली.
यासोबतच, केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयात त्यांची चार वर्ष कारकीर्द राहिलेली आहे. प्रतिनियुक्ती तत्वावर केंद्र शासनाच्या, केंद्रीय दक्षता आयोगात नियुक्तीवर असताना, ते मुख्य दक्षता अधिकारी पदावर कार्यरत होते. यावेळी, त्यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्रालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कडक कार्यवाही केली. अपर निवासी आयुक्त पदावर त्यांनी महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे जून 2014 पासून ते ऑक्टोबर 2018 पर्यंत उल्लेखनीय कार्य केले. त्यानंतर वर्ष 2018 पासून ते आजतागायत, त्यांनी निवासी आयुक्त पदावरची यशस्वी कामगिरी बजावली आहे.
श्यामलाल गोयल यांनी स्वीकारला निवासी आयुक्त पदावरचा कार्यभार
भारतीय प्रशासनिक सेवेच्या 1985च्या तुकडीचे अधिकारी तसेच अपर मुख्य सचिव यांनी आज मावळते निवासी आयुक्त यांच्याकडून निवासी आयुक्त पदाची सूत्र स्वीकारली. गेल्या एक वर्षापासून, श्री. गोयल महाराष्ट्र सदनात गुंतवणूक व राजशिष्टाचार आयुक्त म्हणून कार्यरत होते. तत्पूर्वी, मंत्रालयाच्या स्वच्छता व पाणी पुरवठा विभागात, श्री गोयल प्रधान सचिव म्हणून कार्यरत होते. यापूर्वी, वर्ष 2009 ते वर्ष 2010 दरम्यान, श्री गोयल यांनी महाराष्ट्र सदन येथे निवासी आयुक्त म्हणून कायर्रत होते.
थोडे नवीन जरा जुने