पालकमंत्र्यांकडून आर्वी येथील निधन झालेल्या वीर जवानाच्या कुटुंबाचे सांत्वन

सातारा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी मणिपूर येथे निधन झालेल्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील आर्वी येथील वीर जवान अक्षय यादव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी यादव कुटुंबियांचे सांत्वन करून धीर दिला. शासन स्तरावरून जी मदत लागेल ती करू असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी तहसीलदार रोहिणी शिंदे, कांतीलाल पाटील, संभाजीराव गायकवाड, प्रशांत यादव, आर्वी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने