मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा

भंडारा : शासनाने जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना बँकेकडून सहज व सोप्या पद्धतीने अर्थसहाय्य देऊन स्थानिक युवकांना स्वयंरोजगाराकडे प्रेरित करण्याच्या हेतून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना कार्यान्वित केली आहे.

जिल्ह्यातील युवक युवतीच्या सर्जनशिलतेला वाव मिळून जिल्ह्यात स्वयंरोजगारास पूरक वातावरण तयार करणे व त्याद्वारे राज्यात ग्रामीण तसेच शहरी क्षेत्रात सुक्ष्म,

लघू उपक्रमाद्वारे व्यापक रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासाठी शासनाच्या आर्थिक सहाय्यातून प्रकल्प उभारणीस हातभार लावणे हा योजनचा उद्देश आहे.

 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती काय्रक्रम योजनेची संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने अंमलबजावणी होईल. यासाठी maha-cmegp gov.in हे विशेष पोर्टल अर्जदारांसाठी कार्यान्वित करण्यात आले आहे.

वरील संकेतस्थळावर पात्र अर्जदारांचे अर्ज अपलोड करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रात मदत कक्ष सुरु करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेंतर्गत इच्छूक पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, जांभुळकर निवास, बाबा मस्तानशहा वार्ड, भंडारा येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सी.बी. देवीपुत्र यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने