कोरोनाबाबतच्या उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई

सोलापूर : शहरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव कमी करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे.

नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने कोरोनाच्या उपाययोजनेचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जारी केले आहेत.

 नागरिकांनी सार्वजनिक स्थळी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये सुरक्षित अंतर ठेवावे, चेहऱ्यावर मास्क/रूमाल वापरणे बंधनकारक आहे.

स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक असून नाक, डोळे व तोंड यांना स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्यावी. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या बंद ठेवण्यात याव्यात.

दुचाकीवर केवळ चालक, तीन चाकी वाहनात चालक व इतर दोन आणि चार चाकी वाहनात चालक व इतर दोघांना परवानगी असेल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. उपाययोजनेचे उल्लंघन केल्यास खालीलप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
थोडे नवीन जरा जुने