माजी मुख्य सचिव राम प्रधान यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई, दि. ३१ :- राज्याचे माजी मुख्य सचिव तथा माजी केंद्रीय सचिव राम प्रधान साहेबांच्या निधनानं राज्याच्या,


देशाच्या जडणघडणीत महत्वाचं योगदान देणारं व्यासंगी व्यक्तिमत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. प्रशासकीय सेवेतील उत्कृष्ट अधिकारी,

सामाजिक प्रश्नांचे जाणकार, सचोटीचं व्यक्तिमत्वं म्हणून ते कायम स्मरणात राहतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचे खाजगी सचिव म्हणून राम प्रधान साहेबांनी काम केलं होतं. देशासमोरच्या अनेक जटील प्रश्नांवर तोडगा काढण्यात, उपाय सुचवण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

यशवंतराव चव्हाण सेंटर आणि नेहरु सायन्स सेंटरसारख्या महत्वाच्या संस्थांचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम केलं.

राज्याच्या, देशाच्या प्रश्नांची जाण असलेल्या राम प्रधान साहेबांचं निधन ही राज्याची फार मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

थोडे नवीन जरा जुने