लॉकडाऊनच्या काळात ५२० सायबर गुन्हे दाखल; २७३ जणांना अटक

मुंबई दि.५- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ५२० विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २७३ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे,

अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली. आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी दि. ४ जुलैपर्यंत प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे खालीलप्रमाणे- ■ व्हॉट्सॲप- १९८ गुन्हे ■ फेसबुक पोस्ट्स – २१८ गुन्हे दाखल

■ टिकटॉक व्हिडिओ- २८ गुन्हे दाखल ■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ११ गुन्हे दाखल ■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे ■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ६१ गुन्हे दाखल ■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २७३ आरोपींना अटक.

■ १०८ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश ■ पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद.

त्यामुळे विभागातील नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४६ वर ■ सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात लोकांच्या भावना दुखावतील अशा आशयाचा राजकीय मजकूर असणारी पोस्ट फेसबुक प्रोफाईल वर शेअर केली होती.

त्यामुळे परिसरातील शांतता भंग होऊन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता. मोहाला बळी न पडण्याचे आवाहन सध्याच्या काळात बरेच व्हाटसअप मेसेजद्वारे लोकांना एकतर मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी, किंवा कोणत्याही वेब सीरिजचे सबस्क्रिप्शन स्वस्तात आहे ,

खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर असतो. अशा लिंक्सवर क्लिक करू नये .कारण सदर लिंक्स व मेसेजेस हे सायबर गुन्हेगारांची लोकांना फसविण्याची नवीन युक्ती आहे.

तुम्ही जर त्या लिंकवर क्लिक केले तर एक फॉर्म उघडतो ज्यात तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट्सचे सर्व डिटेल्स,पासवर्डस ,डेबिट/क्रेडिट कार्ड्सची माहिती ,पिन क्रमांक सर्व विचारले जाते .

तुम्ही ही सर्व माहिती दिली की, एक ओटीपी येतो व तो जाणून घेण्यासाठी एक फोन येतो.पलीकडून संभाषण करणारी व्यक्ती आपण त्या कंपनीमधूनच बोलतोय असा आभास निर्माण करून तो ओटीपी तुमच्याकडून काढून घेते व काही वेळाने तुम्हाला तुमच्या बँकेचा एसएमएस येतो की तुमच्या खात्यातून काही रक्कम अनोळखी खात्यात वळविली गेली आहे.

त्यामुळे सर्व नागरिकांनी अशा कोणत्याही मोहाला बळी पडू नये .तसेच जर आपण चुकून फसविले गेले असाल तर त्याची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी व http://www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर पण नोंद करावी. असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’चे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केले आहे.
थोडे नवीन जरा जुने