विद्यार्थ्यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी कार्यक्रमामध्ये ऑनलाईन सहभागी व्हावे

मुंबई, दि. ३१ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे.


विद्यार्थ्यांनी  या कार्यक्रमासाठी ऑनलाईन  युट्यूब च्या माध्यमातून  https://youtu.be/EpQ2y3-Swfs या लिंकद्वारे सहभागी व्हावे असे आवाहन श्री. सामंत यांनी केले.

 

आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली.त्यावेळी ते बोलत होते.

श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह कार्यक्रमाचे

शनिवार दिनांक १ ऑगस्ट २०२० रोजी सकाळी ११:३० वाजता ऑनलाईन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार,

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात प्रा.राजा दीक्षित आणि सचिन साठे यांचे व्याख्यान होणार आहे. तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक आणि   लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावरील चित्रफित दाखविण्यात येणार आहे.

श्री. सामंत म्हणाले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्म शताब्दी समारोह  निमित्त उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने  (झूम)च्या माध्यमातून ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, पत्रकार बांधव यांना ऑनलाईन लिंकद्वारे या कार्यक्रमात सहभागी होता येईल.

या बैठकीला अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने