राज्यात दि. १ ते १३ जुलैपर्यंत १२ लाख ८१ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप

मुंबई दि. 14. राज्यात दि. 1 ते 13 जुलैपर्यंत 868 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 12 लाख 81 हजार 126 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

 राज्यात गरीब व गरजूंना एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 12 लाख 81 हजार 126 असे एकूण दि. 1 एप्रिल ते दि . 13 जुलै या कालावधीत 1 कोटी 2 लाख 60 हजार 655 शिवभोजन थाळ्या वाटप केल्या आहेत.
थोडे नवीन जरा जुने