विभागीय आयुक्तांनी घेतला कोविड संदर्भात आढावा

अकोला,दि.३(जिमाका)- जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भाव सद्यस्थितीबाबत आज सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह अपर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे , आरोग्य उपसंचालक डॉ. फारुकी,

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.मीनाक्षी गजभिये,

डॉ.कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.राजकुमार चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश आसोले, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,

उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे,तहसीलदार विजय लोखंडे आदी उपस्थित होते. यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ या संदर्भात आढावा घेतला.

जिल्ह्यात लवकरच रॅपिड टेस्ट किट दाखल होतील. त्याद्वारे करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करावे.मनपा हद्दीतील जे क्षेत्र अधिक रुग्ण संख्येचे आहे तेथे, जादा संख्येने चाचण्या केल्या जाव्या.

चाचण्या कोणाच्या कराव्या, याचा प्राधान्यक्रम ठरविण्यात यावे. लग्न समारंभात प्रतिबंधांचे उल्लंघन होता कामा नये, या कडे अधिक जागरूकतेने लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले.

तसेच मास्क न परिधान करणारे,सामाजिक अंतराचे उल्लंघन करणारे यांच्यावरही कारवाई करा. प्रतिबंधीत क्षेत्रातील संदिग्ध लोकांच्या तपासण्या पूर्ण करा असे निर्देश दिले.

तसेच उपलब्ध उपचार साहित्य, डॉक्टरांना व कर्मचाऱ्यांना द्यावयाचे पीपीई किट्स व अन्य सुरक्षा साहित्याच्या उपलब्धतेबाबत आढावा घेऊन आवश्यकता भासत असल्यास त्वरीत मागणी नोंदविण्याची सुचना केली.
थोडे नवीन जरा जुने